Reliance Jio 5G: तुमच्या फोनमध्ये ५जी नेटवर्क अ‍ॅक्टिव्हेट कसे कराल?, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया| activate 5G network in your phone you need to get my jio app | Loksatta

Reliance Jio 5G: तुमच्या फोनमध्ये ५जी नेटवर्क अ‍ॅक्टिव्हेट कसे कराल?, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया

5G सेवेमध्ये सध्या रिलायन्स जिओ हे देशभरात आघाडीवर आहे.

Reliance Jio 5 network news
Reliance Jio – लोकसत्ता ग्राफिक्स टीम

सध्या देशात रिलायन्स जिओ हे सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. 5G सेवेमध्ये सध्या रिलायन्स जिओ हे आघाडीवर आहे. देशातील १८४ शहरांमध्ये जिओ आघाडीवर आहे. सध्या जिओने ९४.६ टक्के लोकसंख्येला ५जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. रिसर्च फर्म Techhark च्या अहवालानुसार २५ जनवरी २०२३ भारतातील २५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ५जी सेवेचा वापर करत आहे. या अहवालांनुसार देशातील १८९ शहरांमध्ये ही २५ .२ टक्के लोकसंख्या विखुरलेली आहे.

मात्र काही जणांना आपल्या फोनमध्ये ५जी नेटवर्क कसे अ‍ॅक्टिव्हेट कसे करायचे माहिती नसते. त्यामुळे त्यांना अजून ५जी सेवेचा आनंद लुटता येत नाही. तर आज आपण फोनमध्ये ५जी नेटवर्क कसे अ‍ॅक्टिव्हेट कसे करायचे हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : 5G Network: देशातील ‘इतक्या’ लोकसंख्येपर्यंत पोहचलं ५जी नेटवर्क, ‘ही’ कंपनी सर्वात आघाडीवर

१८४ शहरांमध्ये वापरकर्ते जीओच्या हाय स्पीड इंटरनेट सेवेचा लाभ घेऊ शकतात. जिओ वापरकर्त्यांना वेलकम ऑफर अंतर्गत ५जी डेटा मोफत दिला जातो. जर तुमच्या शहरात ५ जी सेवा सुरु आहे आणि तुमचा फोन ५जी आहे तर तुम्ही या सेवेचा वापर करू शकता. जर तुम्हाला जिओ ५जी सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे २३९ रुपयांचा प्लॅन असणे आवश्यक आहे.

वेलकम ऑफर मिळवण्यासाठी तुमच्याकडे My Jio App मध्ये लॉग इन करावे लागेल. त्यानंतर तुम्ही ५जी नेटवर्क सर्च केली की, तुम्हाला ५जी नेटवर्क मिळेल. जर त्यात नेटवर्क दिसत नसेल तर ५जी नेटवर्क सिलेक्ट करावे लागेल. त्यानंतर My Jio App च्या होम स्क्रीनवर Jio Welcome Offer असे लिहिलेले दिसेल. या कार्डवर क्लीक केले कितुम्ही जिओच्या ५जी सेवा वापरू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 14:02 IST
Next Story
Layoffs News: आर्थिक मंदीचे कारण देत Paypal कंपनी सुद्धा करणार २००० कर्मचाऱ्यांची कपात