भारतातील आघाडीची मोबाईल सेवा प्रदाता एअरटेलने एकाच वेळी चार नवीन योजना सादर केल्या आहेत. यापैकी दोन प्लॅन मासिक कॉलिंग प्लॅन आहेत, ज्यामध्ये तुम्हाला काही डेटा देखील मिळतो. त्याच वेळी, दोन प्लॅन ३० दिवसांच्या वैधतेसह आले आहेत. मासिक कॉलिंगसाठी, एअरटेलने १०९ रुपयांचा प्लॅन सादर केला आहे, तर दुसरा प्लॅन १११ रुपयांचा आहे. पहिल्या प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांची आहे तर दुसऱ्यामध्ये तुम्हाला पूर्ण महिन्याची वैधता मिळते. दुसरीकडे, जर आपण कंपनीच्या व्हाउचर प्लॅनबद्दल बोललो तर, १२८ रुपये आणि १३१ रुपयांचे प्लॅन सादर केले गेले आहेत आणि हे प्लॅन अनुक्रमे ३० दिवस आणि एक महिन्याच्या वैधतेसह आणले गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअरटेलचे मासिक चार नवीन रिचार्ज

  • एअरटेल १०९ योजना
  • एअरटेल १११ योजना
  • एअरटेल १२८ रुपयांचा प्लॅन
  • एअरटेल १३१ रुपयांचा प्लॅन

(हे ही वाचा: चायनीज स्मार्टफोन ब्रँड Vivo वर ईडीचे छापे; देशात ४४ ठिकाणी झाली कारवाई)

एअरटेलचा १०९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर आपण एअरटेलच्या १०९ रुपयांच्या प्लॅनबद्दल बोललो तर हा एक स्मार्ट पॅक आहे जो ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. त्याच वेळी, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना ९९ रुपयांचा टॉकटाइम मिळतो. यासोबत या प्लॅनमध्ये ग्राहकांना २०० एमबी डेटा दिला जातो. तसंच या रिचार्जमध्ये लोकल आणि एसटीडीवर कॉलिंग मिनिटे संपल्यानंतर, २.५ सेकंदांचा दर आकारला जाईल.

एअरटेलचा १११ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे अगदी १०९ रुपयांच्या रिचार्जसारखेच आहेत. परंतु, या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना १ महिन्याची मासिक वैधता मिळते. रिचार्ज प्लॅनमध्ये ९९ रुपयांचा टॉकटाइम आणि २०० एमबी डेटा मिळतो. त्याच वेळी, लोकल आणि एसटीडीवर कॉलिंग मिनिटे संपल्यानंतर, २.५ सेकंदांचा दर आकारला जाईल.

( हे ही वाचा: Mi Smart Band 7 Pro 117 स्पोर्ट्स मोड सपोर्टसह लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये)

एअरटेल १२८ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जर आपण या मासिक प्लॅनच्या १२८ रुपयांच्या रिचार्जबद्दल बोललो, तर कॉलिंगसाठी २.५ पैसे प्रति सेकंद दराने शुल्क आकारले जाते. त्याच वेळी, व्हिडिओ कॉलसाठी ५ पैसे प्रति सेकंद आणि डेटा शुल्क ५० पैसे प्रति एमबी दराने आकारले जाते. याशिवाय लोकल एसएमएससाठी १ रुपये आणि एसटीडी मेसेजसाठी १.५ रुपये द्यावे लागतील. मात्र, या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगसाठी वेगळे व्हाउचर रिचार्ज करावे लागतील.

एअरटेल १३१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलच्या १३१ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर ते अगदी १२८ रुपयांच्या प्लॅनसारखे आहे. फरक फक्त या योजनेच्या वैधतेचा आहे. १२८ रुपयांच्या रिचार्जमध्ये ३० दिवसांची वैधता उपलब्ध आहे. त्याच वेळी, १३१ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ महिना म्हणजेच मासिक वैधता दिली जाते. त्याचबरोबर कॉलिंग आणि डेटासाठी वेगळे रिचार्ज करावे लागेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Airtels 4 new cheap recharge plans will run for a month not 28 days learn information gps
First published on: 07-07-2022 at 15:49 IST