online fraud with annu kapoor and tips to avoid online fraud | Loksatta

ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला ‘हा’ अभिनेता, आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी हे करा

अन्नू कपूर यांच्यासोबत घडलेली घटना हा ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा आहे. ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात हे आपण जाणून घेऊया.

ऑनलाईन फसवणुकीला बळी पडला ‘हा’ अभिनेता, आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी हे करा
प्रतिकात्मक छायाचित्र (pic credit – pixabay)

अभिनेता अन्नू कपूर यांची ऑनालाईन फसवणूक झाल्याची घटना पुढे आली आहे. चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून ४.३६ लाख रुपये काढले आहेत. बँक अधिकारी असल्याचे सांगत केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांना एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने अन्नू यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती दिली, नंतर ओटीपी मागितला. अन्नू यांनी ओटीपी दिल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून ४.३६ लाख रुपये काढून घेतले.

त्यानंतर अन्नू यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी हा पैसा फ्रिज केला आहे. पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईने अन्नू यांना ३ लाख ८ हजार रुपये परत मिळणार आहे. अन्नू कपूर यांच्यासोबत घडलेली घटना हा ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा आहे. गुप्त माहिती कुठलीही शहानिशा न करता दुसऱ्यांना दिल्याने त्याने मोठे नुकसान होऊ शकते. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी कोणत्या गोष्टी करू नये याबाबत आपण जाणून घेऊया.

१) वेरिफाईड बॅज चेक करा

कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी आधी त्याचे वेरिफाईड बॅज तपासा. नंतरच ते अ‍ॅप डाऊनलोड करा. वेरिफाईड नसलेले अ‍ॅप डाऊनलोड केल्यास फोनमधील सर्व माहिती चोरी होण्याची शक्यता असते. तसेच बँकेचे अ‍ॅप डाऊनलोड करताना आधी माहिती घेऊनच ते डाऊनलोड करावे. खोटे अ‍ॅप असल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

२) फ्री वायफायने पैशांचा व्यवहार करू नका

फ्री वायफायने पैशांचा व्यवहार करू नका. यातून देखील ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. बॅकेची माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ देऊ नका. फ्री वायफायचा वापर टाळा.

३) ओटीपी कुणालाही शेअर करू नका

बँकेशी संबंधित किंवी इतर कुठलेही पेमेंट करताना ओटीपी तुमच्या फोनमध्ये येतो. हा ओटीपी कुणालाही शेअर करू नका. याने तुमची फसवणूक होऊ शकते. ओटीपीची माहिती स्वत: जवळच ठेवा.

४) अनोळखी लिंकवर क्लिक करू नका

मेसेजद्वारे लिंक पाठवून सायबर गुन्हेगार तुम्हाला लुटू शकतात. त्यामुळे मॅसेजवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. आणि बँकेच्या नावाने जर असा मॅसेज आला तर त्याची तक्रार करा. फ्री गिफ्ट्स मिळेल या आशेने ब्राउजरमध्ये देखील काहीही ओपन करू नका.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सॅमसंगच्या ‘या’ 5G फोनमध्ये वाढवता येते रॅम, वाचा अमेझॉन सेलमधील दमदार ‘बजेट स्मार्टफोन्स’ची यादी

संबंधित बातम्या

आता WhatsApp वर मराठीतून करा मेसेज; कोणती अ‍ॅप्स करतात मदत जाणून घ्या
YOUTUBE TOP 10 यादी जाहीर, 2022 मध्ये ‘या’ व्हिडिओजना सर्वाधिक पसंती, कोणी पटकवले पहिले स्थान? पाहा
विश्लेषण: युरोपच्या एका निर्णयामुळे Apple ला iPhone ची चार्जिंग सिस्टीमच बदलावी लागणार! काय घडतंय युरोपमध्ये?
Airtel यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३ दिवस मोफत इंटरनेट डेटा, जाणून घ्या ऑफरबद्दल
4999 मध्ये घरी आणा OnePlus चा लेटेस्ट मोबाईल; Amazon Great Freedom Festival Sale च्या Deal विषयी जाणून घ्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
लेकीच्या जन्मानंतर काय बदल झाले? आलिया भट्ट पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली, “अभिनेत्री म्हणून माझा….”
भर वर्गातच शिक्षिकेचा भन्नाट डान्स, विद्यार्थ्यांनाही नाचवलं ; शाळेतील Viral Video इंटरनेटवर गाजला
Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा
“…म्हणूनच आम्ही अलिबागमध्ये घर खरेदी केले” रणवीर सिंगने केला खुलासा
“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!