iPhone 12 खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १२ हजार रूपयांपेक्षा जास्त सूट

Apple iPhone 12 स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आला आहे.

iPhone-12-Discount

Apple iPhone 12 स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. अॅपलचा हा दोन वर्षे जुना आयफोन फ्लिपकार्टवरून १२००० रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह घेता येईल. ६ ते १० जुलै दरम्यान पाच दिवस फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स डेज सेलचे आयोजन करण्यात आले आहे. आणि या सेलमध्ये iPhone 12 वर डिस्काउंट आणि बँक ऑफर्स मिळत आहेत.

iPhone 12 ची किंमत साधारणपणे ६५,९०० रुपयांपासून सुरू होते. पण सध्या ६४ GB स्टोरेजसह iPhone 12 चा बेस व्हेरिएंट ५४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय तुम्हाला बँक ऑफरसह १,२५० रुपयांची झटपट सूट मिळू शकते. याचा अर्थ फोनवर तुम्ही १२ हजार रुपयांपर्यंत बचत करू शकता. हा आयफोन काळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगात घेता येतो.

Apple iPhone 12 Flipkart Offer
iPhone 12 चा ६४ GB व्हेरिएंट सध्या Flipkart वर ५४,९९९ रुपयांना लिस्ट झाला आहे. फोनवर १०,९०१ रुपयांची सूट मिळत आहे. याशिवाय सिटी क्रेडिट आणि डेबिट कार्डने फोन खरेदी केल्यास १० टक्के (१,००० रुपयांपर्यंत) सूट मिळेल. Citi क्रेडिट कार्ड EMI ट्रांजेक्शनवर १,२५० रुपयांपर्यंत सूट असेल. अशा प्रकारे, तुम्ही १२ हजार रुपयांपेक्षा जास्त सूट देऊन iPhone 12 घेऊ शकता.

आणखी वाचा : १ वर्षासाठी रिचार्जची चिंता नाही! Reliance Jio च्या परवडणाऱ्या प्लॅनमध्ये ७३० GB डेटा, अनलिमिटेड कॉल

iPhone 12 च्या १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटबद्दल बोलायचं झालं, तर हा फोन ५९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ६९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या दोन्हीवर आयफोनवर १० हजार रुपयांपेक्षा जास्त सूट आहे.

Apple iPhone 12 Specifications
iPhone 12 मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन २५३२ x ११७० पिक्सेल आहे. iPhone 12 स्मार्टफोन Apple A14 Bionic चिपसेटसह येतो. Apple iPhone 12 मध्ये मागील बाजूस १२ मेगापिक्सेल + १२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. मागील कॅमेराद्वारे डॉल्बी व्हिजनसह ४K HDR फॉरमॅटमध्ये व्हिडीओ शूट केला जाऊ शकतो. आयफोन १२ चे वजन १६२ ग्रॅम आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple iphone 12 price cut 12000 rupees discount offer on flipkart in electronics days sale prp

Next Story
फक्त ६३६ रुपयांमध्ये घरी घेऊन या Realme 9i स्मार्टफोन; जाणून घ्या स्कीम
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी