dot asked telecom operators not to install 5 g services near airport | Loksatta

विमानतळाजवळ राहणाऱ्यांना उशिरा मिळू शकते 5G सेवा

दिल्ली, मुंबई, वारणसी आणि इतर अनेक मोठ्या शहरांमध्ये आता ५ जी सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. या शहरांमध्ये ५ जी असले तरी विमानतळानजिक राहणाऱ्या नागरिकांना ‘५ जी’साठी वाट पाहावी लागू शकते.

विमानतळाजवळ राहणाऱ्यांना उशिरा मिळू शकते 5G सेवा
संग्रहित छायाचित्र

Dot letter over 5 g services near airport : देशात ५ जी सेवा सुरू झाली असून सध्या रियान्स जिओ आणि एअरटेल या दोन दूरसंचार कंपन्या ही सेवा पुरवत आहेत. दिल्ली, मुंबई, वारणसी आणि इतर अनेक मोठ्या शहरांमध्ये आता ५ जी सेवा ग्राहकांसाठी उपलब्ध झाली आहे. या शहरांमध्ये ५ जी असले तरी विमानतळानजिक राहणाऱ्या नागरिकांना ‘५ जी’साठी वाट पाहावी लागू शकते. मीडिया अहवालांनुसार, दूरसंचार विभागाने दूरसंचार कंपन्यांना विमानतळांजवळ ५ जी स्टेशन्स स्थापित करू नये, असे सांगितले आहे.

५ जी सेवेबाबत डॉटने दूरसंचार कंपन्यांना एक पत्र पाठवल्याचे समजते आहे. यात कंपन्यांना २.१ किमी क्षेत्रात ३.३ ते ३.६ गिगाहर्ट्झ बँडमध्ये ५ जी बेस स्टेशन स्थापित करू नये, असे म्हटले आहे. भारतीय विमानतळांच्या धावपट्टीच्या दोन्ही टोकांपासून आणि धावपट्टीच्या मध्य रेषेपासून ९१० मीटर पर्यंत बफर क्षेत्र संरक्षित असावे, असे सांगणयात आले आहे.

(आनंदाची बातमी! ‘REDMI NOTE 11’च्या किंमतीमध्ये मोठी कपात, ५० एमपी कॅमेरा आणि ‘FAST CHARGING’सह उपलब्ध)

धावपट्टीच्या दोन्ही टोकांपसून २ हजार १०० मीटर आणि धावपट्टीच्या मध्यभागापासून ९१० मीटर परिसरात ३ हजार ३०० ते ३६७० मेगाहर्ट्झचे ५जी/आयएमटी बेस स्टेशन नसावे, असे दूरसंचार कंपन्यांना पत्राद्वारे दूरसंचार विभागाडून सांग्यात आले आहे.

५ जीचे उत्सर्जन रेडिओ अल्टीमीटर्समध्ये व्यत्यय आणणार नाही या अनुषंगाने ५ जी बेस स्टेशन्स खाली झुकून असेल हे सुनिश्चित करा, असे पत्रात सांगण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ५ जी बँडबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. ५ जी बँड विमानातील जीपीएस आणि अल्टीमीटरमध्ये व्यत्य आणू शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.

(CYBER FRAUD : नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याच्या नावावर लूट, व्यापाराला १.२२ लाखांचा गंडा)

विमान वाहतूक मंत्रालयाने दूरसंचार कंपन्यांना बफर आणि सुरक्षा क्षेत्राचे स्केच देखील प्रदान केले आहे. त्यांना विमानतळावर आणि आसपास सी-बँड 5G स्पेक्ट्रम तैनात करताना प्रतिकूल परिणामांना कमी करण्यासाठी उपायांची खात्री करण्यास सांगितले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 12:14 IST
Next Story
CYBER FRAUD : नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याच्या नावावर लूट, व्यापाराला १.२२ लाखांचा गंडा