तुम्हाला जर नवीन सिमकार्ड खरेदी करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड किंवा वोटर आयडी कार्डची गरज भासते. बऱ्याचदा आपल्या मनात अनेकवेळा अशी शंका येते की, आपल्या नावावर दुसरे कोणी सिमकार्ड तर वापरत नाही ना. जर तुमच्या मनात देखील अशी शंका येत असेल तर आता चिंता करायची गरज नाही. कारण आता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने फक्त एका मिनिटात तुमच्या नावावर किती सिमकार्ड चालू आहेत हे अगदी सहज तपासू शकता. आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब करुन तुम्ही ही माहिती अगदी एका मिनिटात मिळवू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच काहीवेळेस मोबाईल फोन हरवल्यानंतर नवीन सिम मिळते. तुमचा मोबाइल हरवण्यासोबतच तुमचे सिम देखील जाते. जर तुमचे जुने सिम तुमच्या आधार क्रमांकाशी लिंक असेल आणि त्यातून काही गैरप्रकार घडत असतील तर तुमच्या सिमकार्ड आधार लिंक असल्यामुळे तुम्ही पोलिसांच्या चौकशीत येऊ शकतात. त्यासाठी तुमच्या आधार क्रमांकाशी किती मोबाईल सिम लिंक आहेत हे एकदा तपासणे गरजेचे आहे. तसंच तुम्ही वापरत नसलेले सिम किंवा हरवलेले सिम त्वरित बंद करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला असे दिसून आले की, तुमची माहिती वापरून कोणी सिमकार्ड विकत घेतले आहे आणि ते वापरत आहे. तर तुम्हाला आता चिंता करायची गरज नाही. तुम्ही आता त्याची माहिती ऑनलाइन स्वरूपात मिळवू शकता. त्याचसोबत तुम्ही ती सिमकार्डही ब्लॉक करू शकता.

( हे ही वाचा: फक्त २००० रुपयांमध्ये मिळणार Jio Phone 5G! जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनचे ‘हे’ असतील फीचर्स)

अशाप्रकारे सिम ब्लॉक करा

  • सर्वात प्रथम (https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php) या पोर्टलवर लॉगिन करा.
  • यानंतर तुमचा नंबर टाका आणि पोर्टलवर OTP नमूद करा.
  • आता तुम्हाला स्क्रीनवर सक्रिय कनेक्शनची माहिती दिसेल.
  • येथे तुम्ही अशा क्रमांकांना ब्लॉक करण्यासाठी विनंती पाठवू शकतात, ज्याबद्दल त्यांना माहिती नाही.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many sim cards are active in your name find out in just a minute gps
First published on: 18-08-2022 at 12:09 IST