आजच्या काळात अन्न, वस्त्र, पाणी, निवाऱ्यासह आता जीवन सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे. जीवन सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि कठीण काळात आर्थिक मदतीसाठी विमा सुरक्षा गरजेची आहे. दररोज लोखा लोक विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्यांचा विमा काढतात. भारतात अशी एक सरकारी कंपनी आहे जी गेली कित्येक वर्षे विमा सुविधा पुरवते. एलआयसी असं या कंपनीचे नाव आहे. एलआयसीने पॉलिसीधारकांसाठी घरबसल्या पॉलिसीचे ऑनलाईन स्टेटस चेक करण्याची सुविधा सुरु केली आहे. आपण एसएमएस, फोन नंबर आणि जन्म तारखेच्या माध्यमातून एलआयसी पॉलिसी स्टेटस चेक करु शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशापद्धतीने चेक करा ऑनलाईन पॉलिसी स्टेटस

ज्यांना आपल्याला एलआयसी पॉलिसीचे ऑनलाईन स्टेटस चेक करायचे आहे. त्यांनी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. तुम्ही लॅपटॉप किंवा मोबाईलवर देखील ते तपासू शकता.

१) एलआयसी पॉलिसीचे ऑनलाईन स्टेटस जाणून घेण्यासाठी सर्व प्रथम एलआयसी ऑफ इंडियाच्या अधिकृत साइटवर जा.

२) यानंतर ऑनलाइन सर्विसेज टॅबमध्ये दिलेल्या कस्टमर पोर्टलवर जा.

३) त्यानंतर तुम्हाला लॉगिन पेजवर नेले जाईल, जिथे रजिस्टर्ड यूजरचा पर्याय निवडायचा आहे.

४) तेथे तुमचे यूजर नेम, D.O.B आणि आठ अक्षरांचा पासवर्ड टाका आणि Go वर क्लिक करा

५) पर्यायांच्या सूचीमध्ये, एंरोल्ड डेटवर जा. यानंतर दुसरे पेज ओपन होईल.

६) ते तुम्हाला ड्यू डेट, नावनोंदणी तारीख आणि बोनस बद्दल तपशील देखील प्रदान करेल.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एलआयसी पॉलिसीची स्थिती तपासू शकता.

एसएमएसद्वारे तपासा पॉलिसी स्टेटस

कंपनीने दिलेल्या नंबरद्वारे तुम्ही एलआयसी पॉलिसीचे स्टेटस तपासू शकता. तुम्हाला फक्त रजिस्टर्ड मोबाइल नंबरद्वारे एसएमएस पाठवायचा आहे आणि तुमची एलआयसी पॉलिसी स्टेटस तुमच्या फोनवर पाठवले जाईल. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ‘56677’ नंबरवर ‘ASKLIC Premium’ टाइप करून पाठवा. आता इनबॉक्समध्ये एलआयसी डिटेल्स येतील.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to check lic policy status online through sms phone number sjr