बारीक पीन, पातळ पीनच्या मोबाईल चार्जरची डोकेदुखी संपणार; मोदी सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत

‘या’ नव्या नियमामुळे कोणताही मोबाईल चार्ज करण्यासाठी एकच चार्जर वापरता येणार

बारीक पीन, पातळ पीनच्या मोबाईल चार्जरची डोकेदुखी संपणार; मोदी सरकार नवा नियम आणण्याच्या तयारीत
प्रातिनिधीक फोटो

आपण दिवसभरात अनेक कामांसाठी मोबाईल वापरतो. मोबाईल सतत वापरल्यामुळे त्याची बॅटरी संपण्याची शक्यता असते. अशावेळी चार्जरची सोय आपल्याला आधीच करावी लागते. त्यातही बारीक पीन, पातळ पीन अशी चार्जरचे प्रकार असतात. त्यामुळे बाहेर जाताना आपण एखादेवेळी चार्जर विसरलो तर आपल्या फोनला वापरता येईल असा इतरांचा चार्जर आपल्याला शोधावा लागतो. यामध्ये खूप वेळ वाया जातो. यावर आता कायमस्वरूपी उपाय करण्यात येणार आहे. मोदी सरकार याबाबत एक नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे.

मोबाईलसाठी लवकरच कॉमन चार्जर सादर केला जाऊ शकतो

मोदी सरकार लवकरच सर्व मोबाईल्सना वापरता येईल असा कॉमन चार्जर आणण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकार आणि इंडस्ट्री स्टेकहोल्डर्स यांच्यामध्ये याबाबत एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मोबाईलसह इतर पोर्टेबल डिवाइससाठी वापरले जाणारे कॉमन चार्जर यावर चर्चा झाली. कंज्युमर अफेअर सेक्रेटरी रोहित कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

आणखी वाचा – Redmi 5G स्मार्टफोन मिळतोय बेस्ट ऑफरसह; जाणून घ्या किंमत आणि बरंच काही..

या बैठकीमध्ये पोर्टेबल उपकरणांचे तज्ञ, सीआयआय व एफआयसीसीआयचे प्रतिनिधी, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयूच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. भारतात एक कॉमन चार्जर वापरण्याची ही योजना कशाप्रकारे अंमलात आणता येईल याबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. युरोपमध्ये याआधीच अशी संकल्पना राबवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक चार्जर्स ऐवजी जेव्हा एकच चार्जर वापरात येईल तेव्हा इ-कचऱ्याचा भार कमी होईल. तसेच ग्राहकांसाठी देखील हे फायदेशीर ठरेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Modi goverment about to launch new rule of common charger for all mobiles pns

Next Story
तुमच्या नावावर किती Sim Card ॲक्टिव्ह आहेत; फक्त एका मिनिटात जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी