मोटोरोला कंपनीने या वर्षी ऑगस्टमध्ये चीनमध्ये Motorola Razr २०२२ लाँच करण्यात आला होता. मोटोरोला कंपनी युरोपच्या इलेक्ट्रॉनिक बाजारात आपला नवीनतम फोल्डेबल स्मार्टफोन Razr 2022 सादर करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, टेक टिपस्टर SnoopyTech ने ट्विटरवर फोनची लाँच तारीख आणि किंमत जाहीर केली आहे. हा Motorola Razr 2022 foldable स्मार्टफोन २५ ऑक्टोबर रोजी युरोपमध्ये सादर होणार आहे. त्याची सुरुवातीची किंमत १२९९ युरो (सुमारे १,०५,६९७ रुपये) ठेवली जाऊ शकते. सध्या, मोटोरोलाने फोनच्या लाँच किंवा किंमतीबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Motorola Razr २०२२ फिचर्स

हा स्मार्टफोन Android १२ वर काम करतो. यात क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८ प्लस जेन १ प्रोसेसर, LPDDR5 रॅम आणि UFS ३.१ स्टोरेज अधिक चांगल्या कार्यासाठी देण्यात आले आहे. Razerचा रीफ्रेश रेट १४४Hz आणि २०:९ च्या आस्पेक्ट रेशोसह ६.७-इंचाचा P-OLED डिस्प्ले आहे. फोल्ड केल्यानंतर, त्याची स्क्रीन आकार २.६९ इंच होईल. या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये कंपनीने ५० एमपी मुख्य लेन्स आणि १३ एमपी अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ एमपी कॅमेरा उपलब्ध आहे. हा फोन फक्त काळ्या रंगात उपलब्ध असणार आहे.

आणखी वाचा : सॅमसंगचा आणखी एक स्मार्टफोन लाँच; ‘या’ स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरासहीत मिळणार दमदार बॅटरी आणि बरचं काही…

बॅटरी

Moto Razr 2022 हँडसेट ३,५००mAh बॅटरीने सुसज्ज आहे. त्याची बॅटरी ३३W टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-सी पोर्ट तसेच नॅनो-सिम आणि ई-सिम स्लॉट आहे. यात साइड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

किंमत

Motorola Razr स्मार्टफोन चीनमध्ये ८ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या किमती अनुक्रमे ५,९९९ युआन (रु. ७०,९१७), ६,४९९ युआन (७६,८८४ रुपये) आणि ७,२९९ युआन (८६,२८५ रुपये) आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motorola razr 2022 will be launched on october 25 pdb