‘Nothing’ ब्रँड लॉन्च झाल्यापासून कंपनीने आपली काही निवडकच प्रॉडक्ट लॉन्च केली आहेत. कंपनी लवकरच आपले नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Nothing Phone 2 चा समावेश आहे. हा फोन लवकरच लॉन्च केला जाणार आहे. हा फोन BIS सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट झाला आहे. यामुळे हा फोन भारतात लॉन्च होण्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Nothing Phone 2 चे फीचर्स

Nothing Phone 2 मध्ये तुम्हाला AMOLED डिस्प्लेसह FHD+ रिझोल्युशन मिळू शकते. असे सांगितले जाते की, हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसाह येतो. ज्यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजचा सपोर्ट मिळणार आहे. नथिंग फोनमध्ये UFS 3.1 स्टोरेज सिरीज मिळणार आहे. Nothing Phone 2 मध्ये ५००० mAh ची बॅटरी आणि ६७W चे फास्ट चार्जिंग आणि फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.

किंमत

नथिंग फोन (२) ची किंमत ही नथिंग फोन (१) पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कारण या फोनमध्ये अधिक जास्त फीचर्स असू शकतात. नथिंग फोन (1) ची भारतात सुरुवातीची किंमत ३२,९९९ रुपये होती. OnePlus शी स्पर्धा करण्यासाठी नथिंग कंपनी आपल्या फोनची किंमत वनप्लस ११ R पेक्षा कमी ठेवू शकते. नथिंग फोन (2) हा स्मार्टफोन २०२३ या वर्षामध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : MWC 2023: लवकरच लॉन्च होणार Nothing कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या सविस्तर

रेडमी लॉन्च करणार हा स्मार्टफोन

रेडमी ही स्मार्टफोन्स उत्पादन करणारी कंपनी आहे. भारतामध्ये या कंपनीच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. या कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये Redmi Note 12 4G हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सध्या बाजारामध्ये रेडमीच्या Note 12 सीरिजमधील Redmi Note 12 5G, Redmi Note 12 Pro 5G और Redmi Note 12 Pro Plus 5G स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. Redmi Note 12 4G हा Snapdragon 685 प्रोसेसर असलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन SD680 ओवरक्लॉक व्हर्जनचा आहे. ३० मार्च रोजी हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च केला जाणार आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nothing phone 2 launch india soon bis certification 5000 mah battery and 67 w charging support tmb 01
Show comments