scorecardresearch

MWC 2023: लवकरच लॉन्च होणार Nothing कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या सविस्तर

या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

MWC 2023: लवकरच लॉन्च होणार Nothing कंपनीचा ‘हा’ स्मार्टफोन, जाणून घ्या सविस्तर
नथिंग फोन २ – (Image credit: Cristiano R. Amon)

‘Nothing’ ब्रँड लॉन्च झाल्यापासून कंपनीने आपली काही निवडकच प्रॉडक्ट लॉन्च केली आहेत. कंपनी लवकरच आपले नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये Nothing Phone 2 चा समावेश आहे. हा फोन लवकरच लॉन्च केला जाणार आहे. यादी कंपनीने Nothing इअरस्टिक इअरफोन लॉन्च केले आहेत. Nothing चे सीईओ कार्ल पेई यांनी Nothing Phone 2 बद्दल अधिकृत घोषणा केली आहे.

या वर्षातील सर्वात मोठा मोबाईल शो म्हणजेच मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2023) या शो मध्ये कार्ल पेई यांनी त्यांच्या Nothing Phone 2 च्या मुख्य फीचर्सबद्दल माहिती शेअर केली आहे. या फोनमध्ये Qualcomm CEO Cristiano Amon हा प्रोसेसर असणार आहे. तसेच तो विशेषतः Qualcomm Snapdragon 8 सिरीज प्रोसेसर आहे.

हेही वाचा : MWC 2023: Xiaomi ने केली वायरलेस एआर ग्लासेसची घोषणा; ‘हे’ आहेत उपयोग, जाणून घ्या

Nothing Phone 1 मध्ये Qualcomm Snapdragon 778G+ हा प्रोसेसर आहे. जो प्रामुख्याने मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये गणला जातो. कंपनी आता आगामी फोनला फ्लॅगशिप स्तरावर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनी लवकरच आपल्या या नवीन स्मार्टफोनबद्दल अधिक माहिती जाहीर करू शकते. कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांनी हे स्पष्ट केले की, कंपनी या फोनच्या सॉफ्टवेअरसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. मागच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की Nothing Phone 2 हा स्मार्टफोन फ्लॅगशिप फोन असणार आहे. तसेच या फोनमध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 11:17 IST
ताज्या बातम्या