सणासुदीच्या काळात अलिकडे आपण अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या शॉपिंग वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी करतो. तुम्ही सुद्धा ऑनलाईन खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे कारण आता तुम्ही इंडिया पोस्टच्या माध्यमातून सुद्धा ऑनलाईन खरेदी करू शकता. इंडिया पोस्टनेही आपलं ई-कॉमर्स पोर्टल सुरू केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोस्टाचे नेटवर्क हे विश्वसनीय आणि भारतभर पसरलेले आहे त्यामुळे याचा नागरिकांना नक्कीच फायदा होईल. या नव्या योजनेमुळे आता पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, कारण इंडिया पोस्ट आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणं होम डिलिव्हरी करणार आहे. जेणेकरून ग्राहकांना घरबसल्या इंडिया पोस्टच्या सेवांचा लाभ देता येईल.

(हे ही वाचा : फ्लिपकार्ट सेलमध्ये सॅमसंगच्या ‘या’ 5 जी फोन्सवर मिळणार ५७ टक्क्यांपर्यंत सूट, जाणून घ्या फीचर )

इंडिया पोस्टवरून काय काय मागवता येणार

ग्राहकांना घरबसल्या इंडिया पोस्टच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे. सर्व वस्तूंची डिलिव्हरी थेट लोकांच्या घरापर्यंत करता येईल. इंडिया पोस्टच्या ई-कॉमर्स वेबसाईटद्वारे खरेदी केलेला माल पोस्टमनद्वारे भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील, ग्रामीण भागातीस कोणत्याही नागरिकांपर्यंत पोहोचवला जाईल. या माध्यमातून तुम्ही कपडे, भारतीय पोस्ट उत्पादने, बांगड्या, गिफ्ट, घरगुती उपकरणे व वस्तूंची खरेदी करू शकता.

या सेवेचा लाभ कसा घ्याल?

  • सर्वप्रथम इंडिया पोस्ट Ecom.Indiapost.Gov.In च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • यानंतर होमपेजवर माय अकाऊंट ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला Existing User आणि New user असे दोन पर्याय दिसतील.
  • रजिस्ट्रेशन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. नोंदणी केल्यावर तुम्हाला वैयक्तिक माहिती, पत्ता, पिनकोड समाविष्ट करावा लागेल. माहिती सेव्ह झाल्यावर तुम्हाला नवीन यूजर आयडी पासवर्ड मिळेल.
मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Online shopping can now be done by post pdb