Vivos new smartphone launched | Loksatta

विवोचा ‘हा’ नवा जबरदस्त स्मार्टफोन लाँच! किंमत फक्त…

विवो कंपनीने आपल्या वाय-सीरिज अंतर्गत अनेक स्मार्टफोन सादर केले आहेत. आता कंपनीने एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लाँच केला आहे.

विवोचा ‘हा’ नवा जबरदस्त स्मार्टफोन लाँच! किंमत फक्त…
(Pic Credit- Vivo)

विवो कंपनीने आपल्या वाय-सीरिज अंतर्गत अनेक स्मार्टफोन सादर केले आहेत. आता कंपनीने एक नवीन मिड-रेंज स्मार्टफोन लाँच केला आहे. या महिन्यात कंपनीने बाजारात ‘Vivo Y73t 5G’ सादर केले आहे. पाहा या स्मार्टफोनमध्ये कोणते मिळतील जबरदस्त फिचर्स.

Vivo Y73t 5G स्पेसिफिकेशन्स

  • Vivo Y73T स्मार्टफोन २०:९ आस्पेक्ट रेशोवर सादर करण्यात आला आहे जो २४०८×१०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.५८ इंच फुलएचडी प्लस डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन IPS LCD पॅनेलवर तयार केली गेली आहे जी ६०Hz रिफ्रेश रेटवर काम करते. या फोनचा स्क्रीन टू बॉडी रेशो ९०.६ टक्के आहे आणि हा Vivo मोबाईल १६.७M कलर्स आणि १५००:१ कॉन्ट्रास्ट रेशोला सपोर्ट करतो.

आणखी वाचा : OPPO भारतात सादर करणार ‘हे’ तीन स्वस्त फोन; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स…

  •  Vivo Y73t 5G फोन Android ११ वर सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनमध्ये २.२GHz क्लॉक स्पीडसह ऑक्टा-कोर प्रोसेसरसह ७-नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार केलेला MediaTek Dimensity ७०० चिपसेट आहे. त्याचबरोबर हा मोबाईल ग्राफिक्ससाठी Mali G५७ GPU ला सपोर्ट करतो.
  • हा फोन फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या मागील पॅनलवर, F/१.८ अपर्चरसह ५०-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर LED फ्लॅशसह देण्यात आला आहे, तसेच F/२.४ अपर्चरसह २-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, हा स्मार्टफोन F/२.० अपर्चरसह ८-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेराला सपोर्ट करतो.

Vivo Y73t 5G किंमत

Vivo Y73T 5G फोन तीन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे. ८ जीबी रॅम सह बेस व्हेरिएंटमध्ये १२८ जीबी स्टोरेज दिले गेले आहे, ज्याची किंमत CNY १३९९ म्हणजेच सुमारे १५,९०० रुपये आहे. त्याचप्रमाणे, Vivo Y73t 5G चा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट CNY १५९९ मध्ये लॉन्च केला गेला आहे आणि सर्वात मोठा Vivo Y73t 5G १२ जीबी रॅम २५६ जीबी स्टोरेज प्रकार CNY १७९९ आहे. हा फोन फॉग निळा, ऑटम आणि काळ्या रंगामध्ये दाखल झाला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
EWS Certificate: ईडब्लूएस प्रमाणपत्र बनवणार आहात तर जाणून घ्या ‘ही’ महत्त्वाची गोष्ट, अन्यथा…

संबंधित बातम्या

विश्लेषण: ६ दिवसात १० लाख युजर्स, एलॉन मस्कने केलं कौतुक, गुगलपेक्षा अचूक उत्तर देणारं ChatGPT कसं करतं काम?
घाई कराल तर आकर्षक फोन्सना मुकाल, डिसेंबरमध्ये लाँच होणार ‘हे’ दमदार फोन; १०८ एमपी कॅमेरा आणि बरेच काही
YOUTUBE TOP 10 यादी जाहीर, 2022 मध्ये ‘या’ व्हिडिओजना सर्वाधिक पसंती, कोणी पटकवले पहिले स्थान? पाहा
अबब.. काही मिनिटांतच होणार फूल चार्ज! ‘या’ फोनमध्ये मिळू शकते २५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट
सोशल मीडियावर बराचसा वेळ वाया जातोय का? ‘या’ टिप्स वापरून राहा त्यापासून दूर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
अण्णा नाईक पुन्हा एकदा झळकणार खलनायकाच्या भूमिकेत; पोस्टर आले समोर
“तिच्याजागी मी असतो तर…” रुचिराने इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रोहित शिंदे स्पष्टच बोलला
कहर… गुजरातच्या मंदिरात हत्तीच्या मूर्तीखाली अडकला भक्त; मजेदार Video झाला Viral
पुणे : ‘षड्ज-अंतरंग’मध्ये दिवंगत कलाकारांच्या आठवणींना उजाळा; ‘शताब्दी स्मरण’ प्रदर्शनात पं. भीमसेन जोशी यांची छायाचित्रे
Video : “कानफाड फोडेन, चल निघ” अपूर्वा नेमळेकरने मारण्यासाठी हात उगारताच विकास सावंत संतापला; भांडणाचा व्हिडीओ व्हायरल