ऑनलाइन गेम्समध्ये पुन्हा एकदा तुंबळ युद्ध रंगणार आहे. कारण सर्च इंजिनमध्ये अधिराज्य गाजवणारया गुग्लनेही गेमिंगमध्ये उतरण्याचा निर्णय घेतलं आहे. यामुएले सोनीने आहे मायक्रोसॉफ्टने कंबर कसली असून त्यांचे अनुक्रमे पीएस ४ आणि एक्स बॉक्स वन लवकरच बाजारात येणार आहे. या दोन्ही गेिमग कॉन्सोलविषयी..
पीएस ४ची धम्माल
सोनीने पीएस ४ गेिमग कॉन्सोल’ हा भारतीय मार्केटमध्ये दाखल होण्याच्या तयारीत असून या गेिमग कॉन्सोलमध्ये हार्डवेअर आणि कंट्रोलरमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पीएस४ मध्ये ड्युयल शॉक ४ असा कंट्रोलर आहे, ज्यात नवीन टचपॅड आहे. या टचपॅडने गेिमगमध्ये बराच बदल होईल असे वाटत आहे आणि या कंट्रोलरद्वारे शेअिरगसाठी कंट्रोलर मध्ये एक वेगळे बटन दिले गेले आहे. यात गेिमग कॅमरयाशिवाय गेम्स खेळता येतात. सोनी पीएस४ मध्ये डिस्कद्वारे गेम्स आणून खेळात येणार आहेत आणि सोनी प्लेस्टेशनमध्ये व्हिडीओ किंवा इमेज पाहणे आणि गेम्स खेळणे अशा गोष्टींचा लाभही घेता येणार आहे. सोनीने यात व्हिडिओ काढून शेअर करणे असे फीचर उपलब्ध करून दिले आहे.
एक्सबॉक्सचा पहिला नंबर
एक्स बॉक्स वन मध्ये इंटरनेट आणि गेिमग कमेरयाशिवाय बरेच गेम्स खेळता येत नाहीत. मात्र सर्वात महत्त्वपूर्ण बदल हा कॉन्सोलच्या रॅममध्ये करण्यात आला आहे. नवीन कॉन्सोलमध्ये सीपीयू आणि जीपीयू १७६ जीबी/सेकंड युनिफाइड (शेअर्ड) मेमरी आहे म्हणजे पीएस ४ च्या हार्डवेअरमध्ये 8जीबी यूनिफाइड ॅऊफ5फअट आहे. सोनी पीएस 4 एक्स बॉक्स वनला किंमतीच्या बाबतीत मागे टाकतो. त्याची किंमत सोनीला भारतीय मार्केटमध्ये दुसऱ्या कॉन्सोलच्या हिशेबाने फायदेशीर ठरणार आहे. एक्स बॉक्स वन हा भारतीय मार्केट मध्ये २०१४ मध्ये लाँच होणार असून, सोनी पीएस ४ ला गेिमग कॉन्सोलच्या मार्केट मध्ये मात देऊ शकेल का हा प्रश्न अजून सुटायचा आहे . एक्स बॉक्स वनची बाजारातली किंमत ५०० डॉलर इतकी आहे. एक्स बॉक्स वन हे कायनेकट म्हणजेच गेिमग कॅमेरयासोबत येते आणि यातली वाईट गोष्ट म्हणजे एक्स बॉक्स वन हा कायनेकट शिवाय आपल्याला वापरता येवू शक्त नाही. एक्स बॉक्स वन च्या हार्डवेअरमध्ये ८जीबी यूनिफाइड ऊफ3फअट आहे. एक्स बॉक्स वन मधली सर्वात वैशिष्टयाची बाब म्हणजे ’व्हाइस अ‍ॅक्टिव्हेशन’. याचा अर्थ तुम्ही आपल्या आवाजाद्वारे वर कमांड देऊ शकाल. हे एक अत्याधुनिक मीडिया बॉक्स म्हणून ओळखले जाऊ शकते. कारण यात तुम्हाला क्लाउड स्टोरेजचा वापर करून गेम्सचा डेटा सेव्ह करता येणार आहे. आणि समजा मायक्रोसॉफ्टने एचबीओ, जीओ, इसपीएन अशा चॅनल्सशी करार केला तर तुम्हाला विविध चॅनल्सही बघता येतील. म्हणजे एका डिजिटल केबल बॉक्ससारखाच या एक्स बॉक्सवनचा वापर करता येईल.
सध्याचे सर्वाधिक पसंतीचे ऑनलाइन खेळ
डेड  स्पेस ३
हा गेम पीसी , प्ले स्टेशन ३ आणि एक्स बॉक्स ३६० साठी आहे. विसरल गेम्स यांचा डेड स्पेस ३ हा बहुचíचत ठरण्यास हरकत नाही. डेड स्पेस२चा हा पुढचा भाग आहे. हा गेम प्रोटॅगनिस्ट्स आइझ्ॉक क्लार्क आणि सरजट जॉन कारवर
आधारित असणार आहे. अटलांटिस या बर्फाळलेल्या ग्रहावर हे दोघे चुकून जातात व गेमची सुरूवात होते. ते नेक्रोमॉर्फ स्कर्जला थांबवण्याचा प्रयत्न करतात. या गेममध्ये को-ऑपरेटीव्ह गेम प्ले देण्यात आलाय.
गुगलचे नेक्सेस
सोनी पीएस४ आणि एक्स बॉक्स वनमध्ये स्पर्धा चालू असतानाच आता यात गुगलचाही प्रवेश होत आहे. गुगल आपल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करून गेिमग कॉन्सोल्सच्या क्षेत्रात उतरणार आहे. गुगलने आपले हे कॉन्सोल बाजारात आणण्याचे कारण ’अ‍ॅपल’ला टक्कर देणे हेच असल्याची चर्चा आहे. ’गुगल नेक्सस क्यू ५’ अँड्रॉइडॉच्या लेटेस्ट व्हर्जनसोबत मीडिया स्ट्रीिमगसारखी फीचर्स घेऊन, हा फोन लाँच करणार आहे. तर गुगल आता काही वर्षांत गुगल ग्लास, गूगल कॉन्सोल आणि रिस्ट वॉच आणि बरयाच इतर गोष्टींना घेऊन मार्केट मधे धुमकुळ घालणार आहे. मात्र या सर्व गोष्टी असूनही गुगल आपला जम या नव्या क्षेत्रात बसवू शकेल का, सोनी पीएस ४ आणि एक्स बॉक्स असताना लोकं गुगल कन्सोल्सला पसंती देणार का, या प्रश्नांची उत्तरे मात्र काही काळातच मिळू शकेल.
असेसिन्स क्रीड ३ अमेरिकन रिव्होल्युशन
हा गेम पीसी , प्ले स्टेशन ३ आणि एक्स बॉक्स ३६०साठी आहे. असेसिन्स क्रीड , क्रीड२ , असेसिन्स क्रीड ब्रदरहुड आणि असेसिन्स क्रीड रिव्होल्युशन या गेम्सच्या घवघवीत याशानंतर युबीसॉफ्ट ’ असेसिन्स क्रीड ३: अमेरिकन रिव्होल्युशन ’ हा गेम आणतेय. हा गेम अमेरिकन राज्यक्रांतीवर बनवलेला आहे.तो १७५३ ते १७८३ या काळावर आधारीत आहे. ग्रेट ब्रिटन विरूद्धच्या युद्धातील महत्वाचे मोहोरे या गेममध्ये सामील करण्यात आलेयत. आपल्याला माहित असलेल्यापकी जॉर्ज वॉिशग्टन , बेंजामिन फ्रँकलिन आणि थॉमस जेफरसन ही पात्र या गेममध्ये दिसतील. पौल रीवियर , सॅम्यूअल अ‍ॅडम्स , अँड ईवन किंग जॉर्ज ३ यांच्याशी साम्य असलेली पात्रही यात आहेत.
एनएफएस(नीड फॉर स्पीड) मोस्ट वॉन्टेड २
हा गेम पीसी , प्ले स्टेशन ३ , प्ले स्टेशन विटा , आइ ओएस , अँड्रॉइड आणि एक्स बॉक्स ३६० साठी आहे. खर पाहता एनएफएस हे नावच खूप आहे. सिंगल-प्लेअर सेक्शनमध्ये एक १० रेसर्सची ब्लॅकलिस्ट आहे , एकदम ओरिजिनल मोस्ट वाँटेडच्या सिंगल-प्लेअर सेक्शनसारखे.
मात्र यात आधीच्या गेममधील रॉकपोर्ट शहरातील आरपीडी या पोलिसांच्या गाड्या नसून ली- हार्वेसिटीचे एफसीपीडी हे पोलिस आहेत. गेममध्ये स्टार्ट पॉइण्ट व एण्ड पॉइण्ट दिलाय. प्लेअर स्वत हवा तो रस्ता निवडू शकतो. ’ द वाइल्डेस्ट सिलेक्शन ऑफ कार्स येट ’ ही अप्रतिम स्तुती या गेममधील गाड्यांना मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

More Stories onगेम्सGames
मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big fights in online games
First published on: 04-10-2013 at 08:38 IST