कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील उच्चभ्रूं वस्तीमधील माधव संकल्प सोसायटीतील जलतरण तलावात आज (रविवार) संध्याकाळी एका १६ वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतू, तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आयुष अमित घोष (१६) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खडकपाडा-गोदरेज हिल रस्त्यावर माधव संकल्प गृहसंकुल आहे. संकुलात सदस्यांसाठी सुमारे पाच फूट खोलीचा जलतरण तलाव आहे. रविवारी संध्याकाळी आयुष जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरला. मात्र त्याला तलावाच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला. आयुषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात नेण्यात आला. पोलिसांनी अकस्मिक मृत्युंची नोंद पोलीस ठाण्यात केली आहे.

खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद झिणे यांनी सांगितले की, आयुष माधव संकल्प सोसायटीत कुटुंबासह राहतो. रविवारी संध्याकाळी तो जलतरण तलावात पोहण्यासाठी उतरला. पोहता येत नसल्याने आणि जलतरण तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडून मरण पावला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young man drowns in swimming pool at society in kalyan west msr