नाजूक कंबर असलेली निळ्या डोळ्यांच्या बार्बीने लहानग्यांना भुरळ घातली. जगातील सर्वात प्रसिद्ध बाहुली अशी ओळख तिने गेल्या ५७ वर्षांपासून कायम ठेवली आहे, या बार्बीचा गेल्या वर्षभरापूर्वीच मेकओव्हर करण्यात आला. आता अठरा महिन्यांतर बार्बीचा बॉयफ्रेंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केनचाही मोकओव्हर करण्यात आला आहे. तेव्हा बार्बीसारखा सुंदर निळ्या डोळ्यांच्या हँडसम केनला मॅटलने नव्या रुपात आणलं आहे. पंधरा वेगवेगळ्या रुपात केन आता लहानग्यांच्या भेटीला येणार आहे. ब्रॉड, स्लिम आणि ओरिजनल अशा तीन रुपात केन बाजारात दाखल होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅलिफोर्नियातील ‘मेटेल’ या खेळणी उत्पादक कंपनीने ५७ वर्षांपूर्वी बार्बी बाहुली बाजारात आणली होती. झेब्रा पट्टय़ांचा स्वीम सूट घातलेल्या मृगनयनी बार्बी डॉलची पहिली निर्मिती १९५९ मध्ये मेटेल लाइनने केली होती. या बाहुलीला जगभरातून तुफान प्रसिद्धी मिळाली होती, पण सुरूवातीच्या काळात बार्बीला अनेक विरोधांना सामोर जावे लागले होते. मुलांचे आईवडील व स्त्रीवादी संघटनांनी बार्बीच्या मूळ आकारावर अनेकदा टीका केली होती. तिची शरीररचना ही मुलींच्या शरीररचनेशी तुलना करता अवास्तव आहे, असेच अनेक सुधारणांनंतरही लोकांचे म्हणणे होते. पण एवढा विरोध असूनही तिची प्रसिद्धी काही कमी झाली नाही. उलट हिच बार्बी छोट्या मुलींची घट्ट मैत्रिण झाली.

त्यानंतर फ्रेबुवारी २०१६ मध्ये मेटलने बार्बीचं पूर्ण रुपडंच पालटलं. बार्बी फक्त स्लिम आणि सुंदर न ठेवता त्यांनी सर्वसामान्य मुलींनाही ती आपलीशी वाटेल अशा पद्धीने बनवली. मेटेल कंपनीने उचलेलं हे मोठं पाऊल होतं. त्यांनी फक्त गौर वर्णाचीच नाही तर त्वेचेचे आणि डोळ्यांचे वेगवेगळे रंग असलेली आणि २४ प्रकारच्या केशरचना असलेली बाहुली बाजारात आणली होती. आता त्यानंतर तब्बल अठरा महिन्यानंतर मेटलने केनचं रुप पालटलं आहे. तेव्हा बार्बी प्रमाणे मोकओव्हर केलेल्या केन लहानग्यांना कसा वाटतोय हे पाहण्यासारखं ठरेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Barbie boyfriend ken gets a new makeover