तुम्ही पाउलो कोएलोचं ‘अल्केमिस्ट’ वाचलंय का? त्यात एक वाक्य आहे. आता हे वाक्य तुम्ही ‘ओम शांती ओम’ चित्रपटातही ऐकलं असेलच, अर्थात या चित्रपटातल्या सर्वोत्तम डायलॉगपैकी तो एक होता. ‘कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिस में लग जाती हैं’. तर अशीच काहीशी प्रचिती एक तरूणाला आलीये. तर चिकन नगेट्स या तरुणाचे भयंकर आवडीचे. एका चेन स्टोअरने एक भन्नाट ऑफर ठेवली होती. ज्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट मिळतील त्याला मोफत चिकन नगेट्स ते देणार होते. मग काय ‘फुकट ते पौष्टिक’ म्हणत ते मिळवण्यासाठी या तरूणांची धडपड सुरू झाली, त्याला फुकट नगेट्स मिळवण्यासाठी १ कोटी ८० लाख रिट्विटसची गरज होती. तेव्हा त्याने एक आवाहन टाकले आणि बघता बघता त्याची फुकट नगेट्स खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी साऱ्या नेटिझन्सने मोहिमच सुरू केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोळा वर्षांच्या कार्टरला मोफत चिकन नगेट्स खाण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी ‘वेंडीस्’ या फूड चेन स्टोअरला मेन्शन करत यासाठी काय करता येईल याबद्दल विचारले. तेव्हा त्याने जर वर्षभरात १ कोटी ८० लाख ट्विट मिळवले तर त्याला मोफत चिकन नगेट्स देण्यात येईल, असे सांगितले. कार्टरने आपल्या मित्र मैत्रिणींना आवाहनच टाकले तेव्हा त्याच्या आवाहनाला एवढा प्रतिसाद मिळाला की त्याला नगेट्स मिळावे यासाठी सगळ्यांनीच त्याची पोस्ट रिट्विट करायला सुरूवात केली. आणि बघता बघता त्याची पोस्ट इतक्या युजर्सने रिट्विट केली की सर्वाधिक पोस्ट रिट्विट होण्याचा विक्रम त्याच्या नावे जमा झाला. आधी हा विक्रम हॉलिवूडची प्रसिद्ध मुलाखतकार एलेन डी जेनेर्स हिच्या नावे होता. तिच्या पोस्टला ३४ लाखांहून अधिक रिट्विट्स मिळाले होते. हा विक्रम कार्टरने मोडला आहे. तेव्हा आता त्याला मोफत नगेट्ही मिळाले आणि नवा विक्रमही त्याच्या नावे जमा झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Carter wilkerson has been officially declared the author of the most retweeted tweet