लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर किराणामाल खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर लोकांची गर्दी झाल्याचे चित्र २४ मार्च रोजी दिसून आलं. त्यानंतरही अनेकदा किराणामालाच्या दुकानांमधील गर्दीच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. अशाचत अनेक मोठ्या रिटेल स्टोर्सकडून घरी सामान पोहचवण्याची सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. अशीच सेवा डी-मार्टकडूनही दिली जात असल्याचे अनेक संदेश सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. अनेकांनी यासाठी डी-मार्टचे अ‍ॅपही डाऊनलोड केले. मात्र काही जणांनी चक्क इजिप्तमधील एका शहरामधील डी-मार्ट नावाच्याच कंपनीचे अ‍ॅप डाऊनलोड करुन तिथेच तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेडइटच्या भारतीय प्लॅटफॉर्मवर (म्हणजेच रेडइट r/india या प्लॅटफॉर्मवर) यासंदर्भात यु स्पेझ ६६६ (u/spez666) या युझरने एक पोस्ट शेअर केली आहे.

अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलवर अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्लेवर डी-मार्ट असं सर्च केल्यानंतर पहिला पर्याय येतो तो भारतामधील डी-मार्ट कंपनीचे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा. तर दुसरा पर्याय येतो तो ‘डी-मार्ट स्टोअर’चा. खरं तर हे अ‍ॅप भारतापासून अंदाजे सहा हजार किलोमीटरहून अधिक लांब असणाऱ्या उत्तर इजिप्तमधील डामिएटा शहरातील सुपरमार्केटचे अ‍ॅप आहे.

या अ‍ॅपवरील बरीचशी माहिती इजिप्तमधील स्थानिक अरबी भाषेत आहे. मात्र काही भारतीयांनी हे अ‍ॅप भारतामधील डी-मार्टचे अ‍ॅप समजून डाऊनलोड केलं असून ‘तुम्ही देशामध्ये उर्दूमधील अ‍ॅप कसे चालवू शकता?’ असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

भारतातील डी-मार्ट अ‍ॅपवरही अनेकांनी वेगवेगळ्या तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळेच या अ‍ॅपपेक्षा दुसऱ्या स्थानी दाखवण्यात येणारे अ‍ॅप अधिक चांगले असेल असं समजून अनेकांनी हे इजिप्तमधील डी-मार्टचे अ‍ॅप डाउनलोड केलं आहे.

काहीजणांनी जर हे अ‍ॅप इजिप्तमध्येच आहे तर ते भारतीय युझर्सला का दाखवण्यात येत आहे असा सवाल कमेंटमध्ये उपस्थित केला आहे.

मात्र कारण काहीही असलं तरी अनेकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केल्याने ते गुगल प्लेस्टोअरवर शॉपिंग अ‍ॅपच्या कॅटेगरीमध्ये दहाव्या क्रमांकाला ट्रेण्ड होतानाही दिसले.

रेडइटवर अनेकांनी या पोस्टवर मजेदार कमेंट केल्या आहेत.

यापुर्वीही स्नॅपचॅटच्या कार्यकारी अध्यक्षांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर अनेकांनी गुगल प्लेस्टोअरवर स्नॅपडीलच्या अ‍ॅपवरला कमी रेटींग देत आपला राग व्यक्त केला होता. त्यावेळी स्नॅपडीलला याचा मोठा फटका बसला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus people complain after downloading egyptian app instead of dmart scsg