१३ वर्षाच्या मुलीने लिहिलेली डायरी ठरली जगातील सर्वाधिक वाचले जाणारे पुस्तक; Googleने Doodle द्वारे दिली श्रद्धांजली

आज या पुस्तकाच्या प्रकाशनाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त गुगलने डूडल बनवून अ‍ॅन फ्रँकच्या डायरीतील काही भागांचे सुंदर स्लाइडशो सादर केले आहेत.

Google Doodle Anne Frank
आज या पुस्तकाच्या प्रकाशनाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. (फोटो : Google doodle)

Google Doodle Anne Frank : “मला वाटतं नंतर मला किंवा इतर कोणालाही १३ वर्षांच्या शाळेत जाणाऱ्या मुलीने लिहिलेल्या या गोष्टी वाचण्यात रस असणार नाही.” “माझी मांजर कदाचित एकमेव जिवंत वस्तू असेल ज्याला मी निरोप देईन.” “हो.. इतकं झाल्यावरही मला खात्री आहे की लोकं मनाने वाईट नसतात.” या गोष्टी एका १३ वर्षाच्या मुलीने तिच्या डायरीत लिहल्या होत्या. या गोष्टी कोणी वाचणार नाही असे त्यांना वाटत होते, पण जेव्हा त्यांनी लिहिलेल्या या गोष्टी पुस्तकाच्या रूपात आल्या तेव्हा हे पुस्तक जगातील सर्वाधिक वाचले जाणारे पुस्तक ठरले. आज या पुस्तकाच्या प्रकाशनाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त गुगलने डूडल बनवून अ‍ॅन फ्रँकच्या डायरीतील काही भागांचे सुंदर स्लाइडशो सादर केले आहेत.

ज्यू-जर्मन डायरीस्ट अ‍ॅन फ्रँकने वयाच्या १३व्या वर्षी त्यांची डायरी लिहायला सुरुवात केली. वयाच्या १५व्या वर्षापर्यंत सलग दोन वर्षे त्यांनी ही डायरी लिहिली. ही डायरी ७५ वर्षांपूर्वी याच दिवशी प्रकाशित झाली होती. गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून अ‍ॅन फ्रँकच्या डायरीचे काही भाग स्लाइड शोमध्ये दाखवले आहेत, ज्यात या चिमुरडीने कोणत्या प्रकारची दहशत पाहिली होती आणि त्याबद्दल तिचे काय विचार होते हे दाखवले आहे. हे डूडल गुगलचे आर्ट डायरेक्टर थोका मायर यांनी तयार केले आहे.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

अ‍ॅन फ्रँक यांचा जन्म १२ जून १९२९ रोजी फ्रँकफर्ट, जर्मनी येथे झाला. पहिल्या महायुद्धातच जर्मनीचा नाश झाला होता. यासाठी हिटलरने ज्यूंना जबाबदार धरले आणि सांगितले की जिथे ज्यू सापडतील तिथे त्यांना मारून टाका. यामुळे अ‍ॅन फ्रँकचे कुटुंब जर्मनी सोडून नेदरलँडमध्ये आले. यानंतर दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यानंतर परिस्थिती चिघळली. त्यानंतर फ्रँकच्या कुटुंबाला अ‍ॅमस्टरडॅममध्ये घराच्या मागील भागात राहावे लागले.

हे कुटुंब १९४२ ते १९४४ अशी दोन वर्षे येथे वास्तव्यास होते. या काळात अ‍ॅन फ्रँकने ही डायरी लिहिली. ऑगस्ट १९४४ मध्ये, फ्रँक कुटुंब नाझी गुप्त सैन्याला सापडले आणि त्यांना अटक झाली. दरम्यान, अ‍ॅन आणि तिची मोठी बहीण मार्गारेट फ्रँक यांना नाझी सैन्याने एका छळ छावणीत पाठवले होते, जिथे एका महिन्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यावेळी अ‍ॅन फक्त १५ वर्षांची होती. ही डायरी त्यांच्या वडिलांनी १९४७ मध्ये प्रकाशित केली होती. तेव्हापासून ते ६७ भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्याच्या ३ कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Diary written by a 13 year old girl became the most read book in the world tribute paid by google through doodle pvp

Next Story
VIRAL: महिलेला साप चावल्यानंतर पतीने त्याला बाटलीत टाकून हॉस्पिटल गाठलं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी