काही जणांचं आयुष्य दिसतं तितकं सहज, सुंदर अजिबात नसतं. किती समस्यांना त्यांना समोरं जावं लागतं. काही जण या समस्यांशी लढतात, धडपडतात, नव्या जोमाने उठतात पण लढणं सोडत नाही. तर काही खचून जातात. त्या वाईट काळात त्यांना आधार देणारं, धीर देणारं आपलंसं कोणी नसतंच मग सगळे मार्ग बंद झाले की त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरतो तो आत्महत्येचा. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे हे माहिती असूनही आपल्याच हातांनी ते सुंदर आयुष्य उदध्वस्त करून टाकतात. दरदिवशी आत्महत्या करून आयुष्य संपवणारे असे कितीतरी लोक आहेत आणि आत्महत्या करण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण सुदैवाने काही लोक असेही आहेत की वेळेवर पोहोचून त्यांचे प्राण वाचवतात आणि जगण्याचं एक कारण त्यांना देतात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिला तर तुमचा काळजाचा ठोका चुकेल. पण त्याचबरोबर माणुसकीवरही तुमचा विश्वास बसेल. आत्महत्या करण्यासाठी १५ मजल्यांच्या इमारतीवर चढलेल्या तरूणीला एका जवानाने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले. इमारतीच्या पुढच्या भागात निमुळत्या होत चाललेल्या कठड्यावर ती बसली होती. हातात सुसाईड नोट होती, आजूबाजूचे तिला ओरडून बाजूला करण्याचे प्रयत्न करत होते. पण ती मात्र काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्यातून ती अशा जागी बसली होती की तिथे जाणं म्हणजेही मृत्यूला निमंत्रण देण्यासारखंच होतं. तोल गेला की पंधराव्या मजल्यावरुन खाली पडण्याची भीती होती. अशा वेळी आपला जीव धोक्यात घालून अग्निशमन दलाच्या एका जवानाने तिला वाचवले. सुरक्षित जागा बघून इतरही जवान आले आणि तिला वर खेचले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुदैवाने ती वाचली आणि तिला नवे आयुष्य देण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणाऱ्या त्या जवानामुळे ते शक्य झालं, तेव्हा त्या जवानाचेही कौतुक करावं तेवढं कमी आहे नाही का!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firefighter risking his life to save a suicidal woman