लहान मुले हरवल्याच्या अनेक घटना आपण रोज ऐकत असतो. हरवलेल्या मुलांपैकी फार कमी पुन्हा सापडतात. हरवलेल्या मुलांचा वेळीच शोध घेणे महत्त्वाचे असते अन्यथा आयुष्यभरासाठी पालकांची आणि त्याची ताटातूट होते. विशेषत: जर दिव्यांग मुल असेल तर त्याच्या कुटुंबाचा शोध घेणे फार अवघड असते कारण अशी मुलं काहीच बोलत नाही. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. वरळी येथील १२ वर्षांचा बौद्धिकदृष्ट्या अपंग मुलगा गुरुवारी बेपत्ता झाला होता. पण बेपत्ता झाल्याच्या आठ तासांत मुंबई पोलिसांनी त्याचा शोध लावला आणि त्याला त्याच्या पालकांकडे सुखरूप पोहचवले आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एका QR Code मुळे मुलांच्या पालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

कंडक्टरला सापडला हरवलेला मुलगा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाब्यामध्ये फिरताना रात्री ८.२० च्या सुमारास बेस्टच्या बस कंडक्टरला हा मुलगा सापडला. पोलिसांना एक कॉल आला की, “एक मुलगा, जो पालकांबरोबर नाही, तो डॉ. शामा प्रसाद मुखर्जी चौकाजवळ हा मुलगा सापडला आहे” त्यानंतर पोलिसांनी त्यांची एक टीम घटनास्थळी पाठवली आणि मुलाला पोलिस ठाण्यात नेण्यात आणले. मुलाने त्यांच्या प्रश्नांना उत्तर न दिल्याने त्यांच्या ताब्यात असलेल्या वस्तूंवरून पोलिंसानी त्याचा पत्ता शोधला.

पोलिसांना सापडलं QR code पेंडेंट

पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे, पोलिस हवालदार राहुल नेमिस्टे आणि दीपक देशमुख यांनी पोलिस ठाण्यात मुलाची काळजी घेतली. त्यांनी त्याच्याकडून त्याच्या पालकांचा आणि पत्ता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण मुलाने एक शब्दही उच्चारला नाही. तो फक्त पोलिसांकडे पाहून हसत होता. त्याला काही अपंगत्व आले असावे हे पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी त्याचा खिसा आणि त्याच्याकडे काही आहे का हे तपासण्यास सुरुवात केली जेणेकरून त्यांना त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यास मदत होईल. त्यानंतर नेमिस्टे यांना अचानक मुलाच्या गळ्यात एक पेंडेंट दिसले.

“सुरुवातीला आम्हाला असे वाटले नाही की,”पेंडेंटआम्हाला त्याचे पालक शोधण्यात मदत करू शकेल. जेव्हा आम्ही पेंडेंट लटकन काढले आणि उघडले तेव्हा आम्हाला कागदाच्या तुकड्यावर छापलेला एक QR कोड सापडला,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo

QR code स्कॅन करताच मिळाला पालकांचा पत्ता

पोलिस अधिकाऱ्यांनी कोड स्कॅन केला आणि “projectchetna.in” नावाच्या एनजीओची माहिती मिळाली.. “त्यानंतर आम्ही एका फोन नंबर मिळाला जिथे आम्हाला पासवर्डसह लॉगिन तपशील भरण्याची सुचना देण्यात आले होते. त्यानंतर आम्हाला मुलाचे नाव, पत्ता आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दलचे इतर तपशील मिळाले.त्यात मुलाच्या पालकांचा नंबर देखील होता” असे गोडसे यांनी सांगितले.

खेळायला गेलाेला मुलगा घरी परतलाच नाही

त्यानंतर कुलाबा पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. पालकांना सांगितले की ” १२ वर्षांचा मुलगा दुपारी ३ वाजता खेळायला गेला होता आणि परत आला नाही.”मुलगा बेपत्ता झाल्यानंतर, पालकांनी काही तास त्याचा शोध घेतला, त्यानंतर त्यांनी वरळी पोलिस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार नोंदवली.

हेही वाचा – चंद्राभोवती घिरट्या घालतेय UFO? नासाने शेअर केला रहस्यमयी फोटो, नक्की काय आहे प्रकरण?

QR code ने घडवली हरवलेल्या दिव्यांग मुलाची पालकांशी भेट!

“पोलिसांनी माहिती देताच मुलाचे पालक ताबडतोब कुलाबा येथे आले आणि रात्री ११ च्या सुमारास त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

QR code पेंडेंटची कमाल

पेंडेंटबद्दल विचारले असता, projectchetna.in चे संस्थापक अक्षय रिडलन यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले,, “आम्ही एक नोंदणीकृत एनजीओ चालवतो आणि आम्ही विशेष दिव्यांग मुलांना शिक्षण देणाऱ्या शाळांशी संपर्क साधतो आणि असे पेंडेंट पुरवतो. आम्ही या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे, पेंडेंट हरवलेल्या मुलांच्या पालकांना शोधण्यात मदत करते कारण ही विशेष दिव्यांग मुले त्यांच्या कुटुंबाबद्दल तपशील देऊ शकत नाहीत.”

सप्टेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या NGO ने आत्तापर्यंत ५,५०० पेक्षा जास्त पेंडेंट विशेष दिव्यांग आणि वृद्ध लोकांना वितरीत केले आहेत.