लोकांच्या डोक्यात एकापेक्षा एक भन्नाट कप्लना येतात आणि त्या आपल्याला व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून कळतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एक तरुण डोकं धुण्यासाठी एक आगळावेगळा जुगाड करतो. पाठीवर प्लास्टिक ड्रम ठेऊन पाण्याचा प्रवाह डोक्याच्या दिशेनं ठेवणाऱ्या या तरुणाचा स्मार्टनेसंच वेगळा आहे. अनेकदा आपल्याला आंघोळ करायला गेल्यावर डोक्यावर शॅम्पू लावण्याच्या वेळेत पाणी टाकण्याचा घोळ होत असल्याचं अनेकदा कळंतच नाही. पण या तरुणाने अगदी पद्धतशीरपणे जुगाड करून आंघोळ करताना साबण लावल्यावर पाणी टाकण्याची व्यवस्था केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षावही केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंघोळ करण्यासाठी पाण्याचा जुगाड केलेल्या या तरुणाचा व्हिडीओ रोमा बालवानी नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. एक तरुण आंघोळ करत असताना शॅम्पू लावल्यानंतर पाणी टाकण्यासाठी एक भन्नाट जुगाड करताना या व्हिडीओत दिसत आहे. पाठीवर एक प्लास्टिकचा डब्बा कपड्याने घट्ट बांधून योग्य पद्धतीने पाणी सोडण्यासाठी हा जुगाड पद्धतशीरपणे यशस्वी झाल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – बजाओ! भर लग्नमंडपात नवऱ्यासमोरच नवरीचा भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, “लग्नात अशीच नवरी…”

इथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जवळपास १५ हजार व्यूज मिळाले आहेत. तसंच नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं, कोणतंही तंत्रज्ञान एखाद्या बुद्धीमान माणासाला हरवू शकत नाही. तर दुसऱ्या एकाने म्हटलं, सस्ता, मजबूत आणि टिकाऊ…तर अन्य एका युजरने म्हटलं, मॅम ही आहे 5G टेक्नोलॉजी..

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mans makeshift technique to wash scalp funny video goes viral on social media netizens says its 5g technology nss
First published on: 29-11-2022 at 15:06 IST