परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे दोन्ही मंत्री ट्विटरवर फारच सक्रिय असतात हे एव्हाना सगळ्याच भारतीयांना ठाऊक झाले आहे. त्यामुळे ट्विटरवर या दोघांकडे एखाद्याने मदतीची विनंती केली की मदत मिळालीच समजा. अशा अनेक बातम्या आपल्या वाचण्यात येतात. कोणतीही समस्या असली आणि ट्विट केले की दोघेही तत्परतेने त्याचे उत्तर देतात आणि अडचणीच्या वेळी धावूनही जातात. अगदी व्हिसाचे रखडले काम, मुलाची भेट, पाण्याची सोय उपलब्ध करून देणे अशा अनेक समास्यांचे निराकरण या दोघांनी केले आहे. पण कधी कधी काही जण अगदी शुल्लक कारणांसाठीही या दोघांकडे धाव घेतात.
आता हेच बघाना एकाने रेल्वे मंत्र्यांकडे आपल्या बाळासाठी रेल्वेमध्ये चक्क डायपर पुरवण्याची मागणी केली. अशी अजब मागणी केल्यामुळे ट्विटरवर नेटीझन्सने त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. अशा प्रकारची मागणी करणे म्हणजे बेजबाबदार आणि मुर्खपणाचे लक्षण असल्याची टीका अनेकांनी केली. पण विशेष म्हणजे डायपरची मागणी करणा-या या प्रवाशाला रेल्वे मंत्रालयाने अजिबात नाराज केले नाही. रेल्वेने लगेचच त्याच्या विनंतीची दखल घेत त्याचा पीएनआर नंबर आणि इतर माहिती मागून घेतली आणि त्याची मागणी पूर्ण केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या मुलांसाठी डायपरची मागणी करणारा हा काही पहिलाच प्रवासी नाही याआधी देखील हैदराबाद एक्सप्रेसने प्रवास करणा-या एका प्रवाशाने सुरेश प्रभू यांच्याकडे डायपरची मागणी केली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पुढच्याच स्टेशनवर त्याला डापर उपलब्ध करून दिले होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger tweets railway ministry suresh prabhu for a diaper gets trolled on twitter