-कोण काय कपडे घालून कोणत्या कार्यक्रमाला गेलं याच्याशी आपल्या भारतीयांचे काही घेणं देणं नसतं म्हणा. कोणती अभिनेत्री कोणता ड्रेस घालते, तिचा ड्रेस कोणी डिझाइन केलाय याचंही आपल्याला काही पडलेल नसतं. त्या डिझायनर्सची आणि फॅशन ट्रेंडची नावंच अशी भारी असतात की उच्चारायचं झालं तरी आपली जीभ अडखळते तेव्हा तिची स्टाईल जाऊ दे खड्ड्यात ती कार्यक्रमाला गेली ना! हेच काय ते आपल्यासाठी महत्त्वाचे. पण प्रियांकाच्या बाबातीच मात्र असं झालं नाही. मॅडमच्या फॅशन स्टाईलमध्ये नेटिझन्सने भारीच इन्ट्रेस्ट घेतला इतका की दोन दिवसांपासून ‘क्रिएटिव्ह’ नेटिझन्सने या ट्रेन्च कोटवर एकापेक्षा एक सरस विनोद करायला सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोण कुठला ‘राल्फ लॉरेन’ ब्रँड आणि काय तो ट्रेन्च कोट आपल्याला बाबा यातलं काही समजत नाही. आपल्याला एवढंच कळतं की त्याच्यापासून विनोद कसे तयार करायचे, मग काय गेल्या दोन दिवसात प्रियांका आणि तिचा ‘झगा’ नुसता चर्चेचा विषय ठरला होता. प्रियांकाचे ‘मीम’ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर तिच्या स्टाईलचे कौतुक होत आहे आणि दुसरीकडे मायदेशात मात्र तिच्यावर विनोद व्हायरल होत आहे.  तेव्हा ही गोष्ट प्रियांकापर्यंत पोहोचली नसेल तर नवलंच. पण शेवटी ‘देसी गर्ल’ ती.. भारतीयांची विनोदबुद्धी तिला चांगलीच माहिती आहे. तेव्हा तिने फार काही मनावर घेतलं नाही. मोठ्या मनाने तिने भारतीयांच्या विनोदबुद्धीचे आणि क्रिएटिव्ह डोक्याचे खूपच कौतुक केले. ‘तुमच्या क्रिएटिव्हीटीचे करावे तेवढे कौतुक कमी आहे . माझा ड्रेस फक्त फॅशन स्टेटमेंट नसून, त्याचा एवढा चांगला उपयोग होऊ शकतो हे ऐकून मला खूपच मस्त वाटलं. तुम्ही अशा प्रकारची कल्पकता वापरून असंच कहीतरी करत राहा. तुर्तास इथेच थांबते तेव्हा सगळ्यांनी माझ्या स्टाईलवर बनवलेल्या ‘मीम’चा पोट दुखेपर्यंत आनंद घ्या.’ असं म्हणत तिने इन्स्टाग्रामवर तिला आवडलेले ‘मीम’ शेअर केले आहे.

https://twitter.com/SahilBulla/status/859287120569126912

https://twitter.com/s_brihaspati/status/859256035306905600

https://twitter.com/zoomphatak/status/859267695564513281

https://twitter.com/SociallyMayank/status/859277308074405888

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra share her favourite meme on met gala trench coat