भारतीय वंशाचा ३१ वर्षीय ऋषी शाह हा तरुण अमेरिकेत अब्जाधीश बनला आहे. १० वर्षापूर्वी कॉलेजचे शिक्षण सोडलेल्या या तरुणाला लहानपणापासूनच उद्योगपती बनण्याचे स्वप्न होते. ध्येयाने झपाटलेला या तरुणाचे नाव नुकतेच अब्जाधीशांच्या यादीत सहभागी करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाह यांनी २००६ मध्ये ६० कोटी डॉलरची गुंतवणूक करत ‘आऊटकम हेल्थ’ कंपनीची स्थापना केली होती. त्याची ही हेल्थ केयर टेक कंपनी अमेरिकेतील शिकागो येथे आहे . ऋषी मूळचा भारतीय असून त्याचे वडिल डॉक्टर आहेत. या कंपनीची आताची किंमत ३६० अब्ज म्हणजेच ५.६ अब्ज डॉलर इतकी आहे. ऋषी शिकागोच्या ओक ब्रुक येथे शिकला आहे. त्याचे वडिल डॉक्टर असून ते बऱ्याच वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले. .

डॉक्टरांच्या कार्यालयातील कंटेंट तयार करण्याचे काम या कंपनीतर्फे करण्यात येते. हा विचार आपल्या बहीणीच्या प्रेरणेतून सुचल्याचे शाह याने सांगितले. ऋषीने नॉर्थवेस्ट विद्यापीठातून प्रशिक्षण घेतले असून शिक्षणादरम्यान त्याची श्रद्धा अग्रवाल नावाच्या महिलेशी ओळख झाली. जी आज त्याच्या कंपनीची अध्यक्ष आहे. एका कॅंपस मॅगझिनसाठी लिखाण करत असताना त्या दोघांनी कॉन्टेक्स मिडिया नावाची कंपनी स्थापन केली. यासाठी त्यांनी कर्जही घेतले. जे काही दिवसांतच २०८८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. त्याचवेळी शिकागोमधील डॉक्टरांकडे जात त्यांनी आपल्या डोक्यातील संकल्पना त्यांना सांगण्यास सुरुवात केली.

आज ही कंपनी केवळ यूनिकॉर्न कंपनीचा दर्जा मिळालेली कंपनी नसून ही जवळपास ६४.२६ अब्ज रुपये किंमत असलेली कंपनी आहे. एकूण २०० कंपन्यांच्या यादीत या कंपनीचा ३० वा क्रमांक आहे. काही फिजिशियन आणि रुग्णालयांना ही कंपनी व्हिडिओ मॉनिटरची सुविधा पुरवते. श्रद्धा अग्रवालही लवकरच या यादीत स्थान मिळवेल अशी आशा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Self made billionaire indian american entrepreneur rishi shah