कबड्डी हा खेळ प्राचीन भारतीय खेळ आहे आणि देशात अत्यंत लोकप्रिय आहे. कबड्डी हा सांघिक खेळ आहे. लोक श्वास रोखून कबड्डीचा सामना पाहत असतात. सामन्यामध्ये खेळाडू अंत्य चपळाईने विरोधी गटाच्या खेळाडूला चितपट करतात. कबड्डीच्या खेळातील ही चुरस पाहण्याची मजा काही वेगळीच असते. दरम्यान सोशल मीडियावर अशाच एका सामन्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून लोक थक्क झाले आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये एक चिमुकला खेळाडू देखील दिसत आहे जो त्याच्यापेक्षा शरीरयष्टीने मोठ्या खेळाडूला क्षणार्धात बाद करतो आहे. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. लोक चिमुकल्या खेळाडूचे कौतूक करत आहे.

“मुर्ती लहान पण किर्ती महान” ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. याचा अर्थ असा आहे की, एखादी गोष्ट किंवा व्यक्ती दिसायला अगदी लहान व सर्वसाधारण असते पण तीचे काम खूप मोठे असते. याचीच प्रचिती देणारा चिमुकल्या खेळाडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ एका कबड्डी सामन्याचा आहे ज्यामध्ये काही लहान मुलांचा कबड्डीचा सामना रंगलेला आहे.” पहिली ते पाचवीच्या वयोगटातील ही मुले असावीत. विरोधी संघाचा एक उंच आणि धिप्पाड खेळाडूला पकडण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहे. दरम्यान त्यांच्यामध्ये उंचीने सर्वात लहान खेळाडू पुढे येतो आणि झेप घेऊन त्या उंच खेळाडूचा पाय पकडतो. ज्यामुळे तोल जाऊन उंच खेळाडू जमिनीवर पडतो. चिमुकला काही झाले तरी त्याचा पाय सोडत नाही आणि पायाला चिकटून राहतो. तेवढ्यात इतर खेळाडू पुढे येतात त्या उंच खेळाडूला ओढून खाली पाडतात आणि त्यांच्या अंगावर झोपतात त्याला हालचाल करू देत नाही. चिमुकला देखील खेळाडूच्या पायांना पकडून त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. तो बाद घोषित झाल्यानंतर त्याला सोडून देतात. “

हेही वाचा – टॅटू काढायचा आहे पण भीती वाटते का? टॅटू काढणे खरंच सुरक्षित आहे का? टॅटूमुळे आरोग्याला काही धोका आहे का?

View this post on Instagram

A post shared by Gaurav Rathod (@kabaddi_lover_gr__)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कबड्डीच्या सामन्यातील एक क्षण पाहून लोक थक्क झाले आहे. लोकांना चिमुकल्याचे प्रयत्नांचे कौतूक करत आहे. व्हिडीओ इंस्टाग्रामवर kabaddi_lover_gr नावाच्या अकांउटवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शमध्ये लिहिले आहे की, ” छोटा पॅकेट, मोठा धमाका, पहा लहान मुलगा कसा खेळतो. नाद करा पण, कबड्डीचा कुठं! नाद एकच, फक्त कबड्डीचा!” व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले, जे मोठ्यांना नाही जमलं ते एका चिमुकल्याने करून दाखवले खूप छान बाळा. असाचं खेळत रहा” दुसऱ्याने लिहिले, “मूर्ती लहान पण कीर्ती महान”