नवी दिल्लीतल्या पटेल चेस्ट रस्त्यावर एक छोटासा कॅफे आहे. अनेक पुस्तक प्रेमींचा हा कॅफे आवडते ठिकाण आहे. कारण येथे येणा-या पुस्तकप्रेमींना  या कॅफेने खास सूट दिली आहे. तुम्ही जर येथे असलेल्या दुस-या एका पुस्तकप्रेमीला आपल्या जवळ असलेले पुस्तक वाचायला दिले तर तुम्हाला त्या बदल्यात कॉफी आणि नाश्ता मोफत या कॅफेत मिळतो. दिल्लीमधले अनेक वाचनप्रेमी ‘xco’ या कॅफेत येतात. या कॅफेत येताना तुम्ही तुमच्या जवळ असलेली कथा, कांदबरी, कवितांचे पुस्तक सोबत आणू शकता. हे पुस्तक तिथे येणा-या एखाद्या वाचनाची आवड असणा-यांसोबत बदलून घ्यायचे त्याबदल्यात तुम्हाला ‘xco’  कॅफेमधल्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेता येतो. तुम्ही तुमच्याकडची पुस्तके  इतरांना वाचण्यासाठीही येथे ठेवू शकता. अनेक जण या संधीचा लाभ घेतात. एका शांत कॅफेमध्ये गरमागरम कॉफीचा आनंद घेत पुस्तक वाचण्याची आवड अनेकांना असते. या कॅफेबाहेर बसून वाचनप्रेमी आपले आवडते पुस्तक वाचण्याचा आनंद घेऊ शकतात. आपल्या या नव्या संकल्पनेमुळे हा कॅफे तरुणांमध्ये  खूपच प्रसिद्ध झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This cafe that lets you exchange books for free food