अनेकदा आपल्या आजूबाजूला काय घडतं याच्याशी आपल्याला फार घेणंदेणं नसतं. रस्त्यात अपघात होतात तेव्हा जराही माणसूकी न दाखवता लोक पळ काढतात, तिथे एखादा रस्त्यात उपाशी झोपलेला व्यक्ती दिसला तर त्याला लोक काय माणूसकी दाखवणार म्हणा? पण म्हणतात ना जगात जेवढी वाईट लोक आहेत तेवढीच चांगली लोकही आहेत आणि अशाच एका माणसाच्या चांगुलपणामुळे गरिबाला मध्यरात्रीदेखील पोटभर खायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘अॅज इफ आय हॅव इटन’ या फेसबुकपेजवर एक छोटीशी गोष्ट प्रसिद्ध करण्यात आलीय जी वाचून तुमचा माणूसकीवर नक्कीच विश्वास बसेल. पेशाने इंजिनिअर असलेला मोहम्मद उस्मान कामावरून घरी परतत होता. रात्रीचे दोन वाजले होते. मुसळधार पाऊस होता, अर्ध जग गाढ झोपी गेलं होतं. रस्त्यावर काळकूट्ट अंधार होता. अशा काळोखातही एक वृद्ध व्यक्ती गजरे विकत होता. एवढ्या रात्री त्याच्याकडून कोण गजरे विकत घेणार असा साधा प्रश्न त्याला पडला. पाऊसही होता पण त्या गजरे विकणाऱ्याला कसलीच तमा नव्हती. शेवटी न राहून मोहम्मदने आपली गाडी बाजूला पार्क केली आणि तो गजरे विकणाऱ्यांपाशी गेला.

वाचा : अंडी विकून ८ वर्षांचा मुलगा झाला लक्षाधीश!

एवढ्या रात्री तुमच्याकडून गजरे कोण घेणार? न राहवून त्याने प्रश्न विचारला? तेव्हा गजरे विकणाऱ्याने जे उत्तर दिले ते ऐकून मोहम्मदलाही वाईट वाटलं. या वृद्ध व्यक्तीला बाबा हमीद म्हणून आजूबाजूचे ओळखतात. त्याच्या मुलीचं काही दिवसांत लग्न होणार आहे. लग्नासाठी त्याच्याजवळ पैसे नाहीत तेव्हा तो लग्नासाठी पैसे गोळा करत आहे. रात्री दोन वाजता त्याचे सगळे गजरे भलेही खपणार नाही पण एक दोन गजरे तरी नक्कीच खपतील याची आशा त्याला आहे म्हणूनच तो रात्री देखील गजरे विकत होता.

मोहम्मद त्याला शेजारच्या एका फूड आउटलेटमध्ये घेऊन गेला. त्याने दिवसभापासून काहीच खाल्लं नव्हतं. तेव्हा माझ्यासोबत जेवायला येणार का असा प्रश्न विचारताच बाबा हमीद त्याच्यासोबत लगेच फूड आऊलटेमध्ये जाऊन बसले. आयुष्यात पहिल्यांदाच ते हॉटेलमध्ये बसून सुग्रास जेवण जेवत होते. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मोहम्मदने या क्षणाचे काही खास फोटोही टिपले आहेत जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This heartwarming story of baba hameed who sell garlands will melt your heart