लहानपणी जंगलातील प्राण्यांच्या गोष्टी ऐकताना आपल्याला प्राण्यांची ओळख होते. त्याचवेळी आई-वडिल, आजी-आजोबा, शिक्षक यांच्याकडून त्या प्राण्यांचे फोटो दाखवत त्यांची वैशिष्ट्येही सांगितली जातात. जंगलाचा राजा सिंहाच्या तर आपण कित्येक गोष्टी ऐकल्या असतील. राजा म्हणजे शक्तीशाली, बलवान असाच. त्यामुळे त्याचा जंगलात असणारा दबदबा आणि वर्चस्व याचे वर्णनही आपण ऐकलेले असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मात्र मांजरी कोणालाच घाबरत नाही हेही आपण ऐकलेले आहे. हेच एका मांजरीने नुकतेच दाखवून दिले. जंगलाचा राजाही जिला घाबरतो अशा सिंहीणीला तिने आव्हान दिले. हा व्हिडिओ डेरेक क्रॉन यांनी यू ट्युबवर अपलोड केला आहे. यामध्ये एका सिंहीणीला मांजर आव्हान देत असल्याचे दिसत आहे. ही सिंहीण अमेरिकेच्या टेक्सासमधील द सेंटर फॉर अॅनिमल रिसर्च अॅंड एज्युकेशन संस्थेतील आहे. पिंजऱ्यांच्या बाहेर असणारी काळ्या-पांढऱ्या रंगाची ही लहानशी मांजर या सिंहीणीला घाबरवत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सिंहिणीला मांजरीशी खेळायचे असल्याचे दिसत आहे. मात्र मांजर सिंहिणीला त्रास देण्याच्या मूडमध्ये असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर भलताच व्हायरल होत असून एका दिवसात हा व्हिडिओ ५० हजार जणांनी पाहिला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video lion got scared of cat america