रौद्ररूपी इयान वादळी वाऱ्याशी झुंजणाऱ्या माणसाचा VIDEO VIRAL; लोक म्हणाले, "नाश्त्याला काय खाऊन निघाला होता?" | viral video man battles strong lashes of wind netizens want to know what he ate for breakfast prp 93 | Loksatta

रौद्ररूपी इयान वादळी वाऱ्याशी झुंजणाऱ्या माणसाचा VIDEO VIRAL; लोक म्हणाले, “नाश्त्याला काय खाऊन निघाला होता?”

या व्हिडीओमध्ये इतक्या भयानक इयान वादळात सुद्धा एक माणूस जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यासोबत झुंजताना दिसत आहे.

रौद्ररूपी इयान वादळी वाऱ्याशी झुंजणाऱ्या माणसाचा VIDEO VIRAL; लोक म्हणाले, “नाश्त्याला काय खाऊन निघाला होता?”
(Photo: Instagram/ unilad)

Man Battles Strong Lashes Of Wind : इयान चक्रीवादळाने फ्लोरिडामध्ये ऐतिहासिक विध्वंस घडवून आणला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या समोर आलेली नाही. फ्लोरिडाच्या इतिहासातील हे सर्वात प्राणघातक चक्रीवादळ ठरलंय. या वादळामुळे परिस्थिती एवढी भीषण बनली आहे की, रस्त्यावर शार्क मासेही दिसत होते. सोशल मीडियावर वादळाशी संबंधित अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. त्यापैकीच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये इतक्या भयानक इयान वादळात सुद्धा एक माणूस जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यासोबत झुंजताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये रौद्र रूप धारण केलेल्या इयान वादळाचा वेग पाहून तुम्ही घाबरून जाल. हा माणूस रस्त्याच्या मधोमध उभा असल्याचं दिसून येतंय. या वाऱ्याचा धोकादायक वेग इतका होता की त्याला साधं उभा सुद्धा राहता येत नव्हतं. वादळी वाऱ्यामध्ये सुद्धा निडरपणे कसं बसं घट्ट एका जागेवर उभं राहण्यासाठी तो प्रयत्न करताना दिसतोय. त्याचवेळी वाऱ्यासोबत एका झाडाची तुटलेली फांदी उडत येऊन नेमकी त्याच्या पायाला अडकते. पण तरीही तो तग धरून उभा असतो. मात्र वाऱ्याच्या वेगामुळे त्याचे पाय घसरत होते. यादरम्यान किती तरी वेळा त्याचं नियंत्रण कोलमडतं. पण तो पुन्हा वाऱ्याशी सामना करत घट्ट पाय रोवून उभा राहतो. तेवढ्यात त्याची नजर एका साइन बोर्डवर पडते आणि त्याला पकडण्यासाठी पुन्हा वेगवान वाऱ्याशी झुंज देत हळूहळू साइन बोर्डाच्या दिशेने येतो. बोर्डला पकडून तो बराच वेळ एकाच जागी राहतो. त्यानंतर हळूहळू तो रस्त्याच्या कडेला येतो.

आणखी वाचा : Queen Victoria स्टाईलमध्ये या ८९ वर्षीय आजीने साजरा केला वाढदिवस, VIRAL VIDEO ला २३ मिलियन व्ह्यूज

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल!

या व्हायरल व्हिडीओमधला व्यक्ती रिपोर्टर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच्या हातात माईक सुद्धा दिसत आहे. जिम कॅंटोरे असं या रिपोर्टरचं नाव असून तो एका हवामान वाहिनीसाठी काम करीत असल्यांचं सांगण्यात येत आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक त्याचं कौतूक करताना दिसत आहेत. तर काही यूजर्सनी त्याची हिंमत पाहून “सकाळी घरातून निघताना नाश्त्याला काय खाल्लं होतं?” असा सवाल देखील केलाय.

आणखी वाचा : हे काय? चक्क माणसांना पाहून सिंह घाबरला! विश्वास नसेल होत तर हा VIRAL VIDEO पाहा

unilad नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यत या व्हिडीओला २ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाखाहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे: Mercedes-Benz च्या सीईओंनी १ कोटी ६० लाखांच्या S Class कारमधून उतरुन रिक्षाने केला प्रवास; कारण…

संबंधित बातम्या

Video: “चोरी करून भारी वाटले पण…” चोराचे उत्तर ऐकून पोलीसही लागले हसायला अन तितक्यात…
रशियातही ‘पुष्पा’ फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या, चिमुकल्यांचाही भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral
अहो ऐकता का.. चोरट्या बाईने ‘हे’ एक वाक्य म्हणत सोनाराला घातला लाखोंचा गंडा; Video बघा आणि सावध व्हा
Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
Video: कॉलेजमध्ये बेभान नाचू लागल्या ४ तरुणी; ‘या’ अदा पाहताच नेटकरी झाले फिदा, तुम्हीही पाहा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन’! पाकिस्तानच्या रावलपिंडी मैदानात जो रूटने असं काही केलं…; Video होतोय तुफान Viral
VIDEO: चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अजब शक्कल; चक्क! ‘जॅक लीचच्या…’
“संजय राऊतांना पिसाळलेल्या कुत्रा चावला आहे,” शिंदे गटातील आमदाराची सडकून टीका
शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”
“तुमच्यापेक्षा दाक्षिणात्य स्टार्स….” चाहत्याला ढकलल्यामुळे हृतिकवर चाहते संतापले; व्हिडीओ व्हायरल