नुकत्याच जन्मलेल्या लहान बाळाला कधी चालताना पाहिलंत का तुम्ही? आता हे वाचून तुम्ही उपरोधिकपणे म्हणालही जन्मताच चालायला तो काय ‘बाहुबली’ आहे की दिव्य शक्ती वगैरे घेऊन जन्माला आलेला ‘सुपरहिरो’ आहे? आता तुमचा विश्वास बसत नाहिय ना? मग सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहाच. या सुपरहिरोने सगळ्यांना वेड लावलंय. तसं मुलं जन्माला आलं की आपल्या पायावर उभं राहायला त्याला किमान वर्ष तरी जातच. पण या मुलाच्या बाबतीत मात्र सगळंच उलटच आहे. जन्माला आल्यावर जिथे बाळाचे डोळेही निटसे उघडत नाही तिथे हा चिमुकला चक्क चालण्याचा प्रयत्न करतोय. त्याला असं पाहून डॉक्टरही हैराण झालेत. या बाळाचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल होत आहे. एखादं मुलं जन्मताच चालू लागल्याचं कोणाच्या ऐकिवातही नसेल. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिलाय तर सोशल मीडियावर या व्हिडिओला १ लाखांहूनही अधिक शेअर्स आहेत. हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकले नाही, पण सोशल मीडियावर मात्र या ‘सूपरबेबी’चा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Viral Video : अजगर मगरीची पाच तासांची झुंज!

वाचा : मारहाण झालेल्या पतीला न्याय मिळवून देण्यासाठी पत्नीचा फेसबुकवर लढा

(ट्रेडिंग सेक्शनमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या या सोशल मीडियावर काय व्हायरल होतंय यावरून केलेल्या असतात. त्याची सत्यता पडताळून बघू शकत नाही.)

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch this newborn baby starts walking immediately after being born