पंतप्रधान नरेंद्र मोदींची जबरा फॅन असलेल्या २५ वर्षीय खुशबू दावडाने त्यांना स्वत:च्या हाताने तयार केलेली कलाकृती भेट म्हणून दिली आहे. धागे विणून खुशबूने मोदींचं छायाचित्र असलेली कलाकृती तयार केली. १० किलोमीटरहून अधिक लांब असलेला धागा विणून तिने ही सुंदर कलाकृती तयार केली आहे. यासाठी खुशबूने तब्बल ८५० तास मेहनत घेतली आहे. ७ फूट लांब आणि ७ फूट रुंद असलेल्या या कलाकृतीचे वजन आहे तब्बल ३५० किलो. गुरूवारी झालेल्या कार्यक्रमात ही अनोखी भेटवस्तू तिने मोदींना एका कार्यक्रमात दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही आवडले ट्विटरचे ‘मान्सून इमोजी’

खुशबूने धाग्यांपासून तयार केलेल्या या कलाकृतींचं कौतुक खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केलं आहे. तिने तयार केलेल्या या कलाकृतीची नोंद याआधी लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला सशक्तीकरणासाठी जे पाऊल उचललं आहे त्यामुळे प्रभावित होऊन खुशबूनेही कलाकृती तयार केली असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं.

वाचा : भारतीय वंशाचा अमेरिकन तरुण बनला अब्जाधीश

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman gifts artwork to pm narendra modi