व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप आपल्या किती वापराचे झाले आहे. एका सर्वेक्षणानुसार हे अॅप वापरणा-याची संख्या भारतात सर्वाधिक आहे. या अॅपचा वापर करून आपण किती एकमेकांच्या जवळ आलो आहोत. या अॅपवर आपले वेगवेगळे ग्रुप देखील असतात. ऑफिसचा ग्रुप, शाळा कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींचा ग्रुप, कुटुंबियांच्या ग्रुप, बिल्डिंगमधला ग्रुप असे दहा एक ग्रुप तर असतील. या ग्रुपमध्ये मेसेज फॉरवर्ड करताना अनेकदा चुकून मेसेज जातो. मग आपली चांगलीच पंचाईत होते. त्यामुळे लवकरच चुकून गेलेले मेसेज एडिट करण्याचा नवा पर्याय व्हॉट्सअॅपवर अपलब्ध होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगचे ‘हे’ निमंत्रण देईल संकटाला आमंत्रण

व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करत असताना अनेकदा अनावधानाने आपले मेसेज चुकून भलत्यालाच जातात. कधी कधी तर आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरला पाठवायचा मेसेज चुकून ग्रुपवर किंवा तिस-यालाच पोहचतो. असे अनेक प्रसंग तुमच्या वाट्याला आले असतील. असे मेसेज गेल्यावर किती हसे होते आपले. पण भविष्यात असे हसे करून घेण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. कारण व्हॉट्सअॅपवर लवकरच मेसेज एडिटचा पर्याय उपलब्ध होणार आहे. WABetaInfo या ट्विवटर अकाऊंटवरून दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप प्रायोगिक तत्त्वावर रिव्होक आणि एडिट हे फिचर्स अॅड करणार आहे. त्यामुळे, युजर्स ठराविक वेळेमध्ये पाठवलेले मेसेज डिलीट किंवा इडिट करु शकणार.

वाचा : वर्षाअखेरीस या स्मार्टफोनवर नाही चालणार व्हाट्सअॅप

WABetaInfo च्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप बीटाच्या अँड्राईड २.१७.१.८६९ या व्हर्जनवर हे फिचर्स उपलब्ध आहेत. पण जुना मेसेज  मात्र एडिट करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय आपल्या युजर्सना उपलब्ध करून दिला होता.

वाचा : मुलींना मेसेज करताना ‘हे’ नियम जरूर पाळा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You may soon edit messages on whatsapp