scorecardresearch
  • vaktrutva-spardha

वक्ता दशसहस्त्रेषु

महाराष्ट्राचा वक्ता दशसहस्रेषु कोण?

महाराष्ट्र ही विचारांची भूमी. विचार निर्भीडपणे मांडण्यासाठी हवे ओघवते आणि ओजस्वी वक्तृत्व. अशा वक्त्यांचा जाज्वल्य इतिहास महाराष्ट्राला लाभलेला आहे. राष्ट्र, समाज, संस्कृतीच्या उत्थानात या वक्त्यांचे योगदान अनन्यसाधारण राहिले. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, कीतर्नकार गोविंदस्वामी आफळे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा. राम शेवाळकर, नरहर कुरुंदकर अशी कितीतरी नावे घेता येतील. महाराष्ट्राची ही परंपरा धगधगती ठेवण्याच्या उद्देशाने, खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केली वक्ता दशसहस्रेषु ही वक्तृत्व स्पर्धा. यंदाही मोठ्या उत्साहात व उत्सवात ही स्पर्धा सादर होत आहे. तेव्हा तरुण वक्त्यांनो, या वक्तृत्वोत्सवात सहभागी व्हा. कारण तुमच्यातलाच एखादा किंवा एखादी बनेल… महाराष्ट्राचा वक्ता दशसहस्रेषु!