[ie_dailymotion id=x7g1f2h] नोटाबंदीला ५० दिवस झाल्यानंतरही परिस्थितीत बदल न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आज (सोमवार) राज्यभरात आंदोलन केले. परंतु या आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून गल्लत झाल्याचे दिसून आले. मावळ येथील आंदोलनात कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा देण्याऐवजी मोदी सरकारच्या कौतुकाच्याच घोषणा दिल्या. परंतु यामुळे मात्र तिथे उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांनी दिलेल्या या घोषणांमुळे उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली. मोर्च्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क ‘अब की बार मोदी सरकार’ अशी घोषणा केली. कार्यकर्त्यांच्या या उत्साही घोषणांमुळे मात्र नेत्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.