जावा लँग्वेज शिकण्यासाठी ३० हजार नसल्याने इमारतीवरून उडी मारून तरुणीने संपवलं आयुष्य
पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चशिक्षित तरुणीने शुल्क भरण्यास ३० हजार रुपये नसल्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नम्रता गोकुळ वसईकर असं २४ वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. नम्रताचं बिटेक शिक्षण झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी नम्रताच्या भावाला नोकरी लागली होती. तिलादेखील हिंजवडीत चांगली नोकरी लागेल या आशेवर अवघं कुटुंब शहरात स्थायिक झालं होतं.