पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असं म्हंटलं की पटकन आपल्या डोळ्यासमोर शनिवार वाडा, लाल महाल, विश्रामबाग वाडा अशा जागा येतात पण पुण्याच्या वास्तूवैभवात भर घालणारी जागा म्हणजे महात्मा फुले मंडई. पुण्याच्या दीडशे वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाची साक्षीदार असलेल्या या इमारतीला आपण भेट देणार आहोत आणि जाणून घेणार आहोत मंडईचा इतिहास.
 
   
   
   
  

 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 




 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  