[ie_dailymotion id=x7g1dzb] मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आता फारशी काही अंतरं राहिली नाहीयेत ही बाब नाकारता येणार नाही. विविध प्रकारच्या हिंदी आणि मराठी चित्रपटांना त्यांच्या कथानकांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळत आहे. असाच एक चित्रपट म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘सैराट’. रिंकु राजगुरु, आकाश ठोसर आणि सहकलाकारांच्या साथीने साकारलेल्या या चित्रपटाने एक वेगळीच उंची गाठली आहे हे तर आपण सर्वच जाणतो. याच चित्रपटाचे कथानक सध्या विविध भाषांमध्ये पुनरुज्जिवित केले जात आहे. हिंदीतही या चित्रपटाचा रिमेक होणार असल्याच्या चर्चा सध्या जोरावर आहेत.