[ie_dailymotion id=x7g1bl9] बॉलिवूडमध्ये प्रत्येक अभिनेत्री तिच्या अभिनयाच्या आणि हटके अंदाजाच्या बळावर प्रेक्षकांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करते. अशाच काही अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रीदेवी. बी टाऊनची ‘मिस हवाहवाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर का बरं आहे? असा प्रश्न तुमच्या मनात जर घर करत असेल तर आता त्याचे उत्तर देण्यासाठी खुद्द श्रीदेवीच सज्ज झाली आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाच्या माध्यमातून श्रीदेवी बऱ्याच काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.