[ie_dailymotion id=x7g1boo] इंडियन आयडल फेम १६ वर्षीय युवा गायिका आफरिन नाहिद हिच्याविरोधात आसाममध्ये ४६ मौलवींनी फतवा काढला आहे. कब्रस्तान आणि मशिदीजवळ आयोजित गायनाच्या कार्यक्रमात सहभाग असल्यामुळे तिच्याविरोधात हा फतवा काढण्यात आला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटद्वारे हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले असून, नाहिदविरोधात हा फतवा काढण्यात आल्यामुळे आता कलाकारांच्या स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.