[ie_dailymotion id=x7g1be4] गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपटरसिकांमध्ये बाहुबली २ याच चित्रपटाविषयीच्या बहुविध चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहेत. अशा या बहुप्रतिक्षित बाहुबली २ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. २ मिनिटे चोवीस सेकंदांच्या या ट्रेलरमधील बरीच दृश्ये सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. यामध्ये चित्रपटाच्या भव्यतेची अनुभूती होत असून, त्यासोबतच एस. एस. राजामौली यांनी या चित्रपटातील दृश्यांसाठी लावलेल्या फ्रेम्स अनेकांचेच लक्ष वेधत आहेत. बाहुबलीच्या पहिल्या भागाची पार्श्वभूमी देत ट्रेलरला सुरुवात होते. देवसेना, अमरेन्द्र बाहुबली, कटप्पा, भल्लालदेव या सर्व पात्रांची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.