[ie_dailymotion id=x7g1ah9] 'सैराट'च्या झिंगाट आठवणींना नव्यानं उजाळा दिग्दर्शक नागराज मंजुळेने गावातल्या चिल्लर पोरांना घेऊन मांडलेला ‘खेळ’ असा काही रंगला की वर्ष सरलं तरी खेळातली नशा काही केल्या संपायचे नाव घ्यायला तयार नाही. ‘सैराट’ कलाकृतीचे इतर चित्रपटसृष्टीला लागलेल्या वेडानं आणखी काही दिवस ही झिंग कायम राहणार यात तिळमात्र शंका नाही. ‘सैराट’च्या प्रदर्शनाला या महिन्यात वर्ष पूर्ण होते आहे. २९ एप्रिलला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची चर्चा आजही झिंगाट सुरु आहे. त्यानिमित्त 'सैराट'च्या आठवणीला उजाळा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी #SairatMainia फक्त लोकसत्ता डॉट कॉमवर.