सध्या सोनी मराठीवरील ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेचं निमित्त साधत प्राजक्ताने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ही मालिका नेमकी कशी आहे हे तिने सांगितलं.