एकेकाळी झपाटलेला या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्यामुळेच या चित्रपटाची लोकप्रियता पाहता झपाटलेला २ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता झपाटलेला ३ हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. या आगामी चित्रपटात महेश कोठारेंसह आदिनाथ कोठारेदेखील स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.