कपूरथला जिल्ह्यातील इंटर सर्व्हिस ट्रेनिंग सेंटरमध्ये पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर (PSO) म्हणून तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल अमर सिंग शेरा यांनी लिहिलेले ‘काला चष्मा’ गाणं जगभरात नेटकऱ्यांना भूरळ घालतंय. हे गाणं त्यांनी १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला दहावीत असताना लिहिलं होतं. हे गाणं त्यांच्या परवानगीने २०१६ मध्ये, कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘बार बार देखो’ चित्रपटात वापरण्यात आलं होतं.