Sankarshan Karhade: चालक आजारी पडला अन् संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस, प्रशांत दामलेंनीही केलं कौतुक
प्रशांत दामले सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा एक व्हिडीओ त्यांनी फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये संकर्षण कऱ्हाडे नाटकाची बस चालवताना दिसत आहे. संकर्षणचा हा व्हिडीओ शेअर करत प्रशांत दामलेंनी खास पोस्ट लिहिली आहे