ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. या सन्मानानंतर अशोक सराफ यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. अशातच अशोक सराफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अशोक सराफ यांच्या पायलट भाचीने विमानात खास शैलीत काकांचं अभिनंदन केलं.