रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७८ साली झाली, आजी माजी विद्यार्थ्यांनी बसवलेला बाप्पा “विद्यार्थ्यांचा राजा” नावाने ओळखला जातो. विविध जनजागृती संदेश आगमन वा विसर्जनाची मिरवणूक असो किंवा मंडपातील देखावा असो त्यातून जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. देखावा उभारायचं काम हे आजी माजी विद्यार्थीच करतात. यंदाही वारली चित्रकलेचा वापर करून देखाव्या मार्फत #AdoptABreath हा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी केला आहे.