कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे हा हिरा भारतात परत आणण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या आहेत. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यासाठी इंग्लंड सरकार बांधिल नाही. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी सांगितले.