क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ऑलिम्पिक स्पर्धेला ब्राझीलच्या ‘रिओ द जानेरो’ शहरात पाच ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेसाठी शहर पूर्णपणे सज्ज झाले असून, जगभरातील १० हजारांहून अधिक खेळाडू रिओमध्ये आपलं नशीब आजमवणार आहेत. भारताकडून यंदा ११९ खेळाडूंचे पथक रिओमध्ये दाखल झाले आहे.